रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची शक्यता मावळली आहे. दीड महिन्यांनी निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो, त्यामुळे अत्यल्प काळासाठी बदल न करण्याची शिफारस महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा करणारी ए.के. अन्ॅटोनी समिती करू शकते, असे सूत्रंनी सांगितले.
बारा दिवसांपासून अॅन्टोनी समिती देशभरातील पराभवाची कारणो व पदाधिका:यांची गा:हाणी ऐकून घेत आहे. हा अभ्यास अजून सहा दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे 15 तारखेनंतरच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना अहवाल दिला जाईल, असे काँग्रेसच्या सूत्रंनी सांगितले. या आधी ही समिती प्रत्येक राज्याचा स्वतंत्र अहवाल तयार करणार होती. त्यानुसार, महाराष्ट्राचा अहवाल सहा जुलैला दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परिणात: गेले दोन दिवस अहवालाचे काय झाले, याबाबत राज्यातून अनेकांनी कानोसाही घेतला.
अ.भा. काँग्रेसचे सचिव खा. अविनाश पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की समितीने देशपातळीवरील पदाधिका:यांशी गेल्या काही दिवसांत चर्चा केली आहे. वन-टू-वन भेटीमुळे अनेक गोष्टी कळू शकल्या. त्यांच्या नोंदी आम्ही बारकाईने केल्या आहेत. त्याचा उपयोग नक्कीच होईल. महाराष्ट्राच्या अहवालाला अंतिम रूप येत असून, ही समिती देशपातळीवरील अहवाल तयार करत आहे. त्यामुळे एकत्रितपणो सर्व अहवाल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सादर करण्यात येईल.