वावोशी : खोपोली नगरपरिषदेचा २०१७-१८चा १७४ कोटी ५३ लाख ६५ हजार ५७६ रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष सुमन औसरमल उपनगराध्यक्ष राजू गायकवाड व मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांनी सादर केला. खोपोली नगरपरिषदेचा २०१६-१७चा अर्थसंकल्प १२१ कोटी ४० लाख ६६ हजार ५७६ रु पयांचा होता, त्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत तब्बल त्यात ५० कोटी रु पयांची भर पडून सुमारे पावणेदोनशे कोटी रु पयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात शासनाकडून येणाऱ्या विविध अनुदानाचे साधारण २१ कोटी रु पये येणे असल्याने. या वर्षाच्या अर्थसंकल्पात फुगवटा आल्याचे दिसते. नगरपरिषदेने यावर्षी खोपोली नगरवासीयांना दिलासा देत विविध सेवांवरील करात कोणतीही वाढ केली नाही.या सभेत मागील पाच वर्षांतील काही महत्त्वाच्या विषयावर वादळी चर्चा झाली. यात पाणीपुरवठा योजना, खोपोलीतील विविध गार्डन या सर्वांवर कोट्यवधी रु पये खर्च होऊनही या गोष्टी पूर्ण न झाल्याने यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नगरसेवक बेबी सायमूल, किशोर पानसरे यांनी केला. नगरपरिषद दवाखान्यात आदिवासी महिलांची प्रसूती मोफत करण्याची मागणी नगरसेविका लीला ढुमणे यांनी केली. खोपोली नगरपरिषदेच्या शाळांतील शौचालयाची दुरवस्था झाल्याचा आरोप नगरसेविका केविना गायकवाड यांनी केला. लव्हेज परिसरात पाणी येत नसल्याने पाणीपुरवठा योजनाच फेल असल्याचा घणाघात नगरसेवक अमोल जाधव, नगरसेविका सारिका पिंगळे यांनी केला.खोपोलीतील एका बिल्डरला गार्डन प्लॉटमधून नगरपरिषदेच्या खर्चाने डांबरी रस्ता दिल्याने त्यावर आक्षेप घेत नगरसेवकांनी कारवाई करण्याची मागणी केली. पाणीपुरवठा योजनेवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी नगरसेवक कुलदीपक शेंडे यांनी केली, तर नगरपरिषद दवाखान्यात एक्स-रे मशिन आणि एमडी डॉक्टर नसल्याने रु ग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याची वेळ येत असल्याचा ठपका नागसेविका वनिता कांबळे यांनी ठेवला. आरोप-प्रत्यारोप होत प्रचंड गोंधळात या अर्थसंकल्पावर वादळी चर्चा झाली.
खोपोलीत सेवाकरात वाढ नाही; पावणेदोनशे कोटींचा अर्थसंकल्प
By admin | Published: March 01, 2017 2:56 AM