ठाणे : पावसाने अजून हजेरी लावलेली नसताना, उष्म्याचा कहर सुरू असताना ठाण्यात विजेचाही खेळखंडोबा सुरु झाला आहे. दिव्यात गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा वेगवेगळ््या वेळेबरोबरच सध्या रात्री-अपरात्रीही वीज पुरवठा तीन ते पाच तासांसाठी खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्यात शुक्रवारी तब्बल ११ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने रहिवाशी अधिकच संतप्त झाले होते. येत्या चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मात्र महावितरणच्या कार्यालयावरच हल्लाबोल करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. पावसाळापूर्व कामे आणि तांत्रिक बिघाडाचे कारण सांगत सध्या शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. सकाळ, दुपार अथवा संध्याकाळी केव्हाही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वसुली कमी होत असल्याचे सांगून याचा सर्वाधिक फटका दिव्यातील रहिवाशांना बसतो आहे. महावितरण जरी यातून अंग काढण्याचा प्रयत्न करीत असली, तरी उकाड्याबरोबरच वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे हैराण होण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. वांरवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा परिणाम पाण्यावरही होतो आहे.दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला. नेहमीप्रमाणे दोन-तीन तासांत तो सुरळीत होईल, अशी आशा येथील रहिवाशांना होती. परंतु दुपारी तीनपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे संतापात भर पडली. एकूणच वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रहिवाशांच्या वतीने नीलेश पाटील यांनी महावितरणला निवेदन देऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. येत्या चार दिवसात विजेची समस्या न सोडविल्यास महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, या संदर्भात महावितरणच्या मुंब्रा कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले शुक्रवारी देखभाल, दुरुस्तीची विविध कामे हाती घेण्यात आली होती, त्यामुळेच वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. परंतु सांयकाळी पाच वाजता हा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच वारंवार वीज पुरवठा खंडीत होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)>डोंबिवलीतही रात्रीस खेळ चालेडोंबिवलीतही मंगळवारपासून दररोज रात्री वीजपुरवठी खंडित होत आहे. दत्तनगर परिसरात मंगळवारी रात्री सात तास, नंतर दिवसा आणि नंतर सलग दोन रात्री सतत वीजपुरठा खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाडाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. या खेरीज दररोज पाच-दहा मिनिटे असा सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे
दिव्यात ‘दिवा’च नाही!
By admin | Published: June 11, 2016 3:53 AM