पुणो : नाटक हे आव्हानात्मक असते. कलाकारांचा श्वास प्रेक्षकांना जाणवत असतो. प्रेक्षक मला पाहतात, ऐकतात, हा एका कलाकारांसाठी जिवंत अनुभव असतो. आजवर अनेक चित्रपट, लघुपट केले; पण रंगभूमीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि सरहद्द संस्थेच्या वतीने घुमान येथे 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या पाश्र्वभूमीवर, ‘गुरुग्रंथसाहिब’ या शीखधर्मीयांच्या पवित्र ग्रंथात समाविष्ट असलेल्या संत नामदेव यांच्या अभंगावर आधारित ‘नामदेव बानी’ या ध्वनिचित्रफितीचा प्रकाशन सोहळा नवी पेठेतील पत्रकार भवनात झाला. विष्णुदास भावे पारितोषिक मिळाल्याबद्दल डॉ. जब्बार पटेल यांचा ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगीपं. संजीव अभ्यंकर, दीपा लागू, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संतासिंग मोखा उपस्थित होते. गुरूंच्या हस्ते सन्मान होणो ही खूप मोठी गोष्ट असल्याची भावना व्यक्त करू बी. जे.तील डॉ. लागू यांच्याविषयीच्या आठवणींचा कप्पा पटेल यांनी उलगडला. (प्रतिनिधी)
4डॉ. लागू म्हणाले, की जब्बार याचे नाव डोळ्यांसमोर आले, की बी. जे. मेडिकल महाविद्यालयाचा आराखडा डोळ्यांसमोर येतो.
4माणूस मोठा झाला, की त्याला स्वत:बद्दल बोलायचा संकोच वाटतो; पण जब्बार अशी व्यक्ती आहे जिला मी काय केले आहे ते स्वत: सांगण्याबद्दल कोणताच संकोच वाटत नाही. असा तो ‘मस्त’ माणूस आहे.
4आयुष्यात ज्यांच्याशी अनेक वर्षे मैत्री टिकली, त्यांमध्ये ‘जब्बार’ असा एक ‘पटेल’ आहे. एकमेकांबद्दल बोलून दाखवू नये, एवढा आदर असलेली व्यक्ती म्हणजे जब्बार, अशा शब्दांत आपल्या मित्रविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गुरू-शिष्याच्या अतूट नात्याचा भावनिक ओलावा या वेळी रसिकांनी अनुभवला.
जब्बार पटेल म्हणतात
1 अनेक वर्षे मी रंगभूमीवर काम केले नाही. त्यामुळे विष्णुदास भावे पारितोषिकासाठी मी योग्य नाही, असे वाटत होते. मात्र, पुरस्कार मिळालेल्या यादीत बालगंधर्व, आचार्य अत्रे, केशवराव दाते यासारख्या दिग्गजांची नावे पाहिल्यावर त्यांचाच वारसा आपण चालवीत आहोत. जे काही रंगभूमीसाठी केले त्याची दखल घेतली गेली, असे वाटले आणि पारितोषिक स्वीकारले.
2 पुण्यातील ‘गुडलक’च्या विद्यापीठात आम्ही घडलो. डॉ. लागू हे आमचे कुलगुरू. इंग्लंडहून शिकून आल्यामुळे शेक्सपिअर, बर्नाड शॉ, हे काय आहेत, त्याचे धडे आम्ही त्यांच्याकडून गिरविले.
3 ‘घाशीराम कोतवाल’मधून फक्त राजकीय विचार दिलेला नाही. जगण्याचे मानवी तत्त्वज्ञान त्या नाटकातून विजय तेंडुलकर यांनी सांगितले.