शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

फाजील लोकांना लोकशाहीत स्थान नसते- दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 9:07 PM

लोकमत की अदालतमध्ये अॅड. उज्ज्वल निकम यांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना प्रश्न विचारला

नागपूर- विधान परिषद व विधानसभेत वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या लोकप्रतिनिधींना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यानं गौरविण्यात आलं आहे. लोकमत की अदालतमध्ये अॅड. उज्ज्वल निकम यांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना प्रश्न विचारला आहे. शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी विधानसभेऐवजी विधान परिषदेतील आमदारांचा विचार केला जातो, त्यावर विधानसभेतले शिवसेनेचे आमदार नाराज आहेत, असा सवाल अॅड. उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला. त्याला दिवाकर रावतेंनी सडेतोड उत्तर दिलं.सत्तेत कोणाला मंत्री करायचे हे पक्षश्रेष्ठी ठरवतात. फाजील लोकांना लोकशाहीत स्थान नसते. हा अन्यायाचा विषय नसून संधीचा विषय आहे. संधी मिळेल शंभर टक्के मिळेल, असं रावते म्हणाले आहेत. राजकारण आणि न्यायालयाची तुलनात्मक मांडणी करताना अॅड. उज्ज्वल निकम यांनी राजकारण्यांवर मिश्कील शरसंधान केले. आरोपीच्या पिंज-यात सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते, जयंत पाटील आणि विखे पाटील यांना उभे करण्यात आले होते.या सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याचबरोबर, सुनील प्रभू यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार(विधानसभा), अनिल सोले यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानपरिषद),  श्रीमती यशोमती ठाकूर यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा), श्रीमती विद्या चव्हाण यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानपरिषद), आशिष शेलार यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा) आणि संजय दत्त यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानपरिषद) म्हणून सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Lokmat Vidhi Mandal Purskarलोकमत विधिमंडळ पुरस्कारnagpurनागपूरDiwakar Raoteदिवाकर रावते