अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी माझ्या विरोधाचा प्रश्नच नाही : भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 04:19 PM2019-12-09T16:19:41+5:302019-12-09T16:19:49+5:30
अजित पवार यांनी भाजपसोबत जावून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे खुद्द शरद पवार नाराज झाले होते. हे एकप्रकारे अजित पवार यांचे बंडच होते. त्यामुळे पक्षात मतभेद निर्माण झाले होते. मात्र शरद पवार यांनी ही स्थिती योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे बंड शांत झाले. अर्थात यामुळेच अजित पवार यांच्या मंत्रीपदावर अद्याप शिक्कामोर्तब होण्यास विलंब होत आहे.
मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जावून सत्ता स्थापन करणारे अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे अद्याप उपमुख्यमंत्रीपदी कोण हे राष्ट्रवादीने अद्याप उघड केले नाही. तर छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असतील तर त्याला आपला विरोध असण्याचा प्रश्नच नाही, असं म्हटलं आहे.
अजित पवार भाजपसोबत गेले असताना त्यांना परत आणण्यासाठी आपण देखील प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी विरोधाचं करणच नाही, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. तसेच पक्षात कोणाला कोणतं पद द्यायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान शरद पवार हेच योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी देतील यात शंका नाही. तसेच अजित पवार यांच्याविषयीचा निर्णय तेच घेतील. त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असतील तर त्याला आपला विरोध नसल्याचा पुनरोच्चार त्यांनी केला.