शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

विसर्जन मिरवणुकीत वाजवा रे वाजवा... आवाजावर आता मुंबईसह राज्यभरात कोणतेही बंधन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 4:08 AM

केंद्र सरकारने जारी केलेल्या सुधारित ध्वनिप्रदूषण नियमावलीस तहकुबी देत, राज्यात ‘शांतता क्षेत्रां’ची बंधने लागू करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने...

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या सुधारित ध्वनिप्रदूषण नियमावलीस तहकुबी देत, राज्यात ‘शांतता क्षेत्रां’ची बंधने लागू करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुंबईसह राज्यभर मंगळवारी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन लाऊडस्पीकर व बॅण्डबाजांसह दणक्यात होऊ शकेल.न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयाने राज्य सरकारने नव्याने अधिसूचना काढल्याखेरीज राज्यात ‘शांतता क्षेत्र’ लागू होणार नाही. धार्मिक स्थळे, इस्पितळे, न्यायालये व शाळांच्या १०० मीटर परिसरात मोठा आवाज करण्यावर व अन्यत्र रात्री १० नंतर लाऊडस्पीकर लावण्यावर बंधने नसतील. त्यामुळे श्री विसर्जन मिरवणुका स्थळकाळाच्या मर्यादांशिवाय धडाक्यात काढता येतील. उच्च न्यायालयाने ‘शांतता क्षेत्र’ व इतरत्र रात्री १० नंतर मोठा आवाज केला, म्हणून संबंधितांवर कायद्याचा बडगा न उगारण्याची मुभा दिली होती. परंतु त्यामुळे नियमांचे बंधन कायम राहून उत्साही उन्मादावर विरजण पडून प्रसंगी खटके उडण्याची जी शक्यता होती, तीही दूर झाली आहे.तर देशात कुठेच लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत...अजय मराठे आणि डॉ. महेश विजयबेडेकर या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जनहित याचिका करून केंद्र सरकारच्यानव्या अधिसूचनेस आव्हान दिले. त्याला उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी हंगामी स्थगिती दिली होती.केंद्र सरकारच्या अधिसूचनेचा असा शब्दश:अर्थ लावल्यास, देशात कुठेच लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत, असा युक्तिवाद राज्य सरकारने केला. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठवकील चंदर उदय सिंग यांनी अधिसूचनाचुकीची असल्याचे म्हटले़सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने मराठे व बेडेकर यांना नोटिसा काढून दोन आठवड्यांत उत्तरे देण्यास सांगून हायकोर्टाच्या अंतरिम आदेशास स्थगिती दिली.मुंबईत पाच हजार सीसीटीव्हींद्वारे नजर-बाप्पाचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जन सोहळ्यातील घडामोडींवर पोलिसांची नजर असणार आहे. त्यासाठी ड्रोन तसेच पाच हजार सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे या विसर्जन सोहळ्यावर ‘वॉच’ ठेवण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर मंगळवारी शहरातील ११९ ठिकाणी बहुतांश मोठ्या बाप्पांसह घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेसोबतच सुरक्षेसाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरयांनी सोमवारी चौपाट्यांची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला. मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवानांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १२ तुकड्या तैनात ठेवण्यातआल्या आहेत.चोरांपासून सावधान...गर्दीचा गैरफायदा घेतचोर, लुटारू या गर्दीत सहभागी होतात. अशावेळी भाविकांनी त्यांच्या सामानाची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच कुठेकाही संशयास्पद वस्तू आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.विसर्जन मिरवणुका, चौपाट्या या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस भाविक बनून सहभागी होणार आहे. गर्दीत कोणी महिलांसोबत असभ्य वर्तन करताना आढळल्यास त्यांची रवानगी कोठडीत करण्यात येईल.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनSupreme Courtसर्वोच्च न्यायालय