शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जावई पडल्याचं दुःख नाही, तेवढं दुःख खैरे पडल्याचं - रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 2:33 PM

या निवडणुकीत चंद्रकांत खैरे उमेदवार नव्हते, तर नरेंद्र मोदी उभे होते. 

मुंबई : औरंगाबाद लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना 31 वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच पराभवाचा धक्का बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावई पडल्याचे दु:ख नाही, तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे पडल्याचे म्हटले आहे. 

चंद्रक्रांत खैरे यांच्या पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निवडणुकीत जावई पडल्याचे दु:ख नाही, तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे पडल्याचे आहे. मी स्वतः भाकित केले होते की चंद्रकांत खैरे निवडून येतील. मात्र, काही राजकीय गणितं चुकतात, असे रावसाहेब दानवे म्हणाले. तसेच, या निवडणुकीत चंद्रकांत खैरे उमेदवार नव्हते, तर नरेंद्र मोदी उभे होते. 

याचबरोबर, पक्ष संघटनेने चांगली कामे केली म्हणून आम्ही जिंकलो असे सांगत पहिल्यांदा सरकार स्थापन करणार, त्यानंतर विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच, या निवडणुकीत अपयश मिळालेल्या काँग्रेसवर टीका करताना रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यात आता काँग्रेसला एकही उमेदवार मिळणार नाही, यासाठी त्यांनी जाहिरात द्यावी लागेल. 

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला असून त्यांच्या पराभवाला रावसाहेब दानवे यांचे जावई आणि उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा हातभार लावला. हर्षवर्धन जाधव हे या निवडणुकीचे गेमचेंजर ठरले असून, या निवडणुकीत आ. इम्तियाज जलील यांनी बाजी मारजी आहे. 

शिवसेनेची पहिली शाखा मराठवाड्यात स्थापन झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी ज्या निवडणुका लढविल्या त्या जिंकल्या. ही निवडणूक मात्र त्यांच्यासाठी घाम काढणारी ठरली. पक्षातील गटबाजी आणि अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडली. भाजपानेदेखील हातचे राखून काम केले. खा. रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी पूर्ण भाजपने काम केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी मतमोजणीपूर्वी केला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील जाधव यांना मदतीचा हात दिल्यामुळे चंद्रकांत खैरेंनी आखलेली रणनीती कोलमडली, याचाच फायदा आ. जलील यांना झाला, त्यांनी अतिशय भूमिगत पद्धतीने प्रचारतंत्र वापरून शिवसेनेच्या हिंदू-मुस्लिम या पारंपरिक राजकारणाला छेद देत विजयश्री खेचून आणली. या सगळ्या धामधुमीत काँग्रेसचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांना १ लाख मतांचा पल्ला गाठता आला नाही. 

१९८० नंतर मुस्लिम समुदायाला संधीमुस्लिम समुदायाला १९८० नंतर खासदारपदी विराजमान होण्याची संधी आ. इम्तियाज जलील यांच्या रूपाने मिळाली आहे. ३९ वर्षांनंतर सोशल इंजिनिअरिंगच्या राजकारणाचा पॅटर्न राबवून भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खा. असदोद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने नवीन राजकीय समीकरणाची पायाभरणी औरंगाबादेत केली. त्याचे फळ म्हणून आ. जलील यांना ऐतिहासिक विजय मिळविता आला.

विजयाची कारणे अशी-१) दलित-मुस्लिम मतांच्या जादूचा एमआयएमला लाभ.२) अपक्ष उमेदवार जाधव यांनी खैरेंचे मतदान फोडले.३) ग्रामीण भागातील मतदान काँग्रेसकडे गेले नाही.४) शहरातील नागरी समस्यांमुळे खैरेंना विरोध.५) शिवसेनेच्या मतविभाजनामुळे एमआयएम एकतर्फी जिंकले.चंदक्रांत खैरे यांच्या पराभवाची कारणे१) पारंपरिक प्रचार पद्धतीनेच मतदान मागितले.२) मनपातील राजकारणात ढवळाढवळीचा फटका.३) नवमतदारांच्या मनातील कल जाणून घेतला नाही.४) विकासाऐवजी सांप्रदायिक मुद्यांवर प्रचार.५) नाडी-पुडी, सबसे बड़ा बाबा या उपाधींमुळे अंधश्रद्धांध म्हणून टीका.माझे बॅड लक असल्याचे म्हणाले, चंदक्रांत खैरे... पराभव होणार असल्याचे २३ व्या फेरीअंती चंदक्रांत खैरे यांच्या लक्षात आले होते; परंतु देवावर विश्वास आहे, निश्चित काहीतरी चांगला निकाल लागेल, असे चंदक्रांत खैरे म्हणाले; परंतु पुढील फे-याअंती निकाल येताच माझे बॅड लक आहे, असे सांगून त्यांनी मतमोजणी केंद्र सोडले.२१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्तनिवडणुकीत २४ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २१ उमेदवारांना एकूण मतदानाच्या १६ टक्केमतदान घेता आले नाही. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेaurangabad-pcऔरंगाबाद