शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

पाण्याअभावी रोहिणी नक्षत्राचा पेराच नाही

By admin | Published: May 30, 2016 1:38 AM

भोर तालुक्यातील शेतकरी उन्हातान्हाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो.

भोर : रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा या पारंपरिक समजप्रमाणे भोर तालुक्यातील शेतकरी उन्हातान्हाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो. मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीसाठी रान तयार असतानाही शेतात धूळवाफेवर पेरणी करण्याचे धाडस शेतकरी करीत नाही. आकाशाकडे डोळे लावून बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहतोय खरीप हंगामातील भाताच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची बांधबंधिस्ती नांगरणी उखळणी करून तरवे भाजून रान तयार करून ठेवले आहे. मंगळवारी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र निघाले खरे; पण मात्र मागील तीन महिन्यांत एक-दोन पाऊस वगळता एकही वळवाचा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होण्याऐवजी आभाळाकडे डोळे लावून शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. रोहिणी नक्षत्रात पेरलेले भाताचे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने मोत्यापेक्षा श्रेष्ठ असते. जमीन तापलेली असते, हवेतही उष्मा असतो आणि अशा वेळी जर बी धूळवाफेवर पेरले (टोकणले) तर ते तरतरून उठते. पीक जोमाने उभे राहते. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या पेरणीला शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते.रोहिणी नक्षत्र निघण्याआधी वळवाचा जोरदार पाऊस झालेला असतो. या पावसामुळे रानांच्या मशागतीही आटोपलेल्या असतात. रान चांगल्या प्रकारे तयार असते. रोहिणी नक्षत्र निघाले की पेरणीला सुरुवात करायची, अशी गणिते ठरलेली असतात. त्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी वेगवेगळी बियाणे, खते घरी आणून ठेवली आहेत. धूळवाफेवरच्या पेरण्यांसह भात नाचणीचे तरवे टाकण्याचे कामही याच मुहूर्तावर करतात. घराभोवतीच्या परसबागेतही भोपळा, दोडका, कारली, राजगिरा, भेंडी, मेथी यांसारख्या वेगवेगळ्या पालेभाज्यांची अळी घातली जातात. गौरीगणपती आणि दसऱ्याच्या सणाला या भाज्या भरपूर प्रमाणात येता. पावसाळ्यात भाज्यांची गरज घरातील परसबागेतच भागवली जाते. हे यामागचे आर्थिक गणित होते, असे आपटी गावचे माजी सरपंच व वयोवृद्ध शेतकरी जानबा पारठे यांनी सांगितले.जमीन पाण्यासाठी आसुसलेली. अशा भयानक परिस्थितीत तारखेप्रमाणे रोहिणी नक्षत्राचे आगमन झाले नाही. आणि आगमनाला आभाळात एक ढगही नाही की पावसाचा थेंबही पडलेला नाही. यंदा मॉन्सून मोठ्या प्रमाणात बसरणार, अशी भाकिते केली जातात. मात्र तो बरसणार कधी, याचा अंदाज कुणालाही आलेला नाही. मात्र, वळवाच्या पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील धूळवाफेवरच्या पेरण्या रखडल्या आहेत. (वार्ताहर)४\भोर तालुक्याची लोकसंख्या १७१७१९ असून १९८ गावे आहेत. त्यातील खरिपाची १५५ गावे असून, एकूण खातेदार ५३८९६ आहेत. तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून ७८०० हेक्टरवर भाताचे तर त्याखालोखाल नाचणीचे पीक ३९०० हेक्टरवर घेतले जाते. तृणधान्य १०९०० हे, कडधान्य १००० हे, गळीत धान्य ७२०० हे, सोयाबीन २५०० हेक्टरवर घेतले जाते. खरीप हंगाम २०२०० हेक्टरचा असून, तालुक्यासाठी सुमारे १६०० क्विंटल बियाणे लागते. यात बासमती, रत्नागिरी १४, कोलंबा, सोनम, कर्जत १८४, तांबडीसाळ याचा समावेश आहे.