लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो (मेट्रो-३)च्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील जवळपास तीन हजार झाडे तोडण्यात येणार असून त्यापैकी कित्येक झाडे तोडण्यात आली आहेत. वृक्षतोडीचे काम अजूनही आरेच्या काही भागात सुरू आहे. परंतु तोडलेली झाडे आरेच्या इतर भागात पुनर्रोपित केली जातील, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली होती. परंतु वृक्षतोड होऊन चार-पाच महिने उलटले तरी पुनर्रोपणाची प्रक्रिया ठप्प आहे.वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत आरेमध्ये किती झाडांचे पुनर्रोपण केले, याबाबत प्राधिकरणाकडे माहिती मागितली होती. यावर प्राधिकरणाने वरील माहिती पिमेंटा यांना दिली आहे. वृक्षारोपणासाठी व वृक्ष पुनर्रोपणासाठी कोणत्या जागा निश्चित केल्या, या प्रश्नावर माहिती देताना प्राधिकरणाने सांगितले की, वृक्षारोपणासाठी सर्वेक्षण क्रमांक २१ अंतर्गत १३१७४०.२ चौरस मीटर, सर्वेक्षण क्रमांक २३ अंतर्गत १८३५.७ चौरस मीटर, सर्वेक्षण क्रमांक २५/ए अंतर्गत १३३०३३२.९ चौरस मीटर, सर्वेक्षण क्रमांक १६९ अंतर्गत ९७ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे.
आरे कॉलनीमध्ये एकही झाड लावले नाही
By admin | Published: July 15, 2017 2:15 AM