शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

तातडीने पाणी नाहीच

By admin | Published: October 21, 2015 2:53 AM

मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास

मुंबई : मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याची अंमलबजावणी २४ आॅक्टोबरनंतर होईल, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. कोर्टाने मात्र, ‘जीएमआयडीसी’च्या निर्णयावर स्थगितीस नकार दिला.राज्य जलनियामक प्राधिकरणाने १९ सप्टेंबर २०१४ला ‘जीएमआयडीसी’ला मराठवाडा व नाशिकला किती पाणी सोडायचे, या संदर्भात सूत्र बनवून दिले. आदेशाची अंमलबजावणी करत ‘जीएमआयडीसी’ने १७ आॅक्टोबर २०१५ रोजी मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या मुळा धरणातून १.७४ टीएमसी, प्रवरामधून ६.५० टीएमसी, गंगापूरमधून १.३६ टीएमसी, दारणामधून ३.२४ टीएमसी असे एकूण १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. नाशिक व नगरच्या शेतकऱ्यांनी निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी नाशिक व अहमदनगरच्या पिण्याच्या व शेतीच्या पाणीपुरवठ्याशी तडजोड न करता, १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाला दिली.खंडपीठाने आता स्थगिती देण्यास नकार देत, पुढील सुनावणी २३ आॅक्टोबरला ठेवली. राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)टास्क फोर्स नेमण्यासाठी अवधी हवाआता पाणी सोडल्यास नाशिक व अहमदनरमध्ये त्याचा बेकायदा उपसा होईल. यास आळा बसवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याने आता तातडीने मराठवड्याला पाणी सोडणार नाही. जायकवाडीत अजिबात पाणी नाही. त्यामुळे बीड व लातुरला एक महिन्याने, तर औरंगाबादला २० दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. वग्यानी यांनी केला.