शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

अगदी शेवटच्या क्षणाला मोठा ट्विस्ट आला! दोन निलेश लंके मैदानात; सुजय विखेंची चाल की...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 2:50 PM

Nilesh Lanke vs Sujay Vikhe: रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत. तिथे २०१४ ला तसाच घोळ झाला होता सुनिल तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने ११००० मते मिळविली होती, तर तटकरे २००० मतांनी पडले होते. 

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपाने सुजय विखेंना पुन्हा उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार निलेश लंके यांनी उमेदवारी दाखल केली आहे. अशातच शेवटच्या दिवशी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणाला मोठा डाव टाकला आहे. निलेश लंके नावाच्या आणखी एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरला आहे. 

आता अहमदनगर लोकसभा निवडणुकीत दोन निलेश लंके उभे राहणार आहेत. निलेश साहेबराव लंके नावाच्या व्यक्तीने आपला अर्ज दाखल केला आहे. यामुळे एकतर निशाणी नवीन आणि लंकेही दोन दोन अशा संभ्रमात खऱ्या निलेश लंकेंची मते डमी निलेश लंके घेणार आहे. 

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव निलेश ज्ञानदेव लंके असे आहे. यामुळे तुतारी वाजविणारा माणूस मतदारांना शोधावा लागणार आहे. गडबडीत डमी निलेश लंके यांच्या नावासमोरील बटण देखील दाबले जाण्याची शक्यता आहे. ईव्हीएमसमोर भल्याभल्यांची धांदल उडते, यामुळे डमी उमेदवार असेल तर चुकून त्याला मतदान केले जाते. रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत. तिथे २०१४ ला तसाच घोळ झाला होता सुनिल तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने ११००० मते मिळविली होती, तर तटकरे २००० मतांनी पडले होते. 

पवार गटाचा आरोप...सुजय विखे यांनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपराच आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे. 

टॅग्स :nilesh lankeनिलेश लंकेahmednagar-pcअहमदनगरSujay Vikheसुजय विखेNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४