पुणे : येत्या मंगळवारपासून (दि. २४) विवाह मुहूर्त सुरू होत असल्याने विवाह समारंभाचा धूमधडाका उडणार आहे. २४ नोव्हेंबर ते जुलै २0१६ या कालावधीत एकूण ७४ विवाह मुहूर्त आहे. यंदा ४४ मुहूर्त गोरज आहेत. शुभमंगल सावधान हे सुर सनई-चौघड्याच्या स्वरासह आता सर्वत्र घुमणार आहेत. त्यामुळे शहरातील अनेक नामवंत मंगल कार्यालयात तारीख बुक करण्यासाठी वधू-वर पक्षाकडून धावपळ सुरू झाल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. यंदा डिसेंबर व फेब्रुवारी या महिन्यांमध्ये सर्वाधिक १४ मुहूर्त आहेत. विवाह मुहूर्त निवडताना अनेक जण सुटीचा विचार करीत असतात. मे महिन्यात शाळेला सुटी असते. मात्र यंदा वैशाख ज्येष्ठ महिन्यात अर्थात मे, जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्तच नाहीत. १३ नोव्हेंबर २0१५ ते ४ एप्रिल २0१६ या कालावधीत ४२ मुहूर्त वास्तुशांतीचे आहेत. विवाहेच्छूंना मुहूर्ताचेच वेध लागलेले आहेत. मुहूर्तही भरपूर असल्याने २४ नोव्हेंबरनंतर समारंभांचा धडाका सुरू होणार आहे. पहिल्याच लग्न मुहूर्ताला शहरातील बहुतांश मंगल कार्यालये बुक झाली आहेत. शहरातील प्रसिद्ध कपड्याच्या दुकानात ग्राहकांच्या रांगा दिसून येत आहेत, तर काही नामांकित मॉल मध्ये तरुणाईची गर्दी होत आहे. तसेच शहरातील खादी भांडारामध्ये अनेक तरुण कपडे शिलाई करण्यासाठी टेलरची विनवणी करताना दिसून येत आहेत.शहरात भटजींची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांचे महिनाभर आधीच बुकिंग झाले आहे. भटजी मिळत नसल्यामुळे अनेक कार्यमालकांची धावपळ उडाली आहे. त्यामुळे अनेक जणांनी बाहेर जिल्ह्यांतील भटजींचे बुकिंग केले आहे. अनेकांनी बऱ्याच ठिकाणचे आमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांची धावपळ होणार आहे.दरम्यान लग्नासाठी खासगी ट्रव्हल्सचे मोठ्या प्रमाणात बुकींग झालेले आहे. तसेच या काळात एसटींनाही गर्दी होण्याची शक्यता आहे. सुटीच्या दृष्टीने रविवारचाच मुहुर्त असावा अशी अपेक्षा विवाहेच्छुकांची आहे. परंतु त्याला मुरड घालावी लागत आहे. तसेच विवाह समारंभासाठी अनेक चाकरमान्यांनी सुट्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने अनेक कामे खोळांबळणार आहेत.(प्रतिनिधी)नोव्हेंबर : २४, २६, २७,डिसेंबर : ४, ६, ७, ८, १४, १५, १६, २0, २१, २४, २५, २८, ३0, ३१जानेवारी : १, २, ३, ४, १७, २0, २१, २६, २८, २९, ३0, ३१फेब्रुवारी : १, २, ३, ४, ५, ११, १३, १६, १७, २२, २४, २५, २७, २८मार्च : १, ३, ५, ६, ११, १४, १५, २0, २१, २५, २८, ३१एप्रिल : १, २, ४, २६, १७, १९, २२, २३, २४, २६, २७, २९, ३0मे : १जुलै : ७, १0, ११, १२, १३
आली समीप लग्न घटिका
By admin | Published: November 23, 2015 12:56 AM