ऑनलाइन लोकमत/नंदकिशोर नारेवाशिम, दि. 09 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याने बाजारपेठेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक मोठया व्यावसायिकांनी आज दुकानेच उघडली नाहीत. लघु व्यावसायिकांनी मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंपावर बंद झालेल्या नोटा चालत असल्या तरी जेवढी रुपयाची नोट तेवढे पूर्ण पेट्रोल भरुन घेण्याचे बंधनकारक केले आहे.देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ३० डिसेंबर २०१६ पर्यंत ५०० आणि १००० च्या नोटा पोस्टात किंवा बँकेत जमा करता येणार आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले असले तरी बँका, एटीएम बंद असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक त्रास सहन करीत असले तरी पंतप्रधांनानी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत सुध्दा करीत आहेत. दोन ते तीन दिवसानंतर सर्व सुरळीत होणार असल्याचे नागरिकांत चर्चा आहे.शहरातील मोटारसायकलचे शोरुम नोटा बंद झाल्यानंतरही नोटा स्विकारत असल्याचे दिसून आले. दररोजची उलाढाल बघता हे पैसे बँकेत भरता येत असल्याने त्यांच्याकडून विरोध होतांना दिसून येत नाही. लघु व्यावसायिकांची मात्र चांगलीच पंचाईत होतांना दिसून येत आहे. शहरात आज अनेकांनी दुकानदारांना ५०० रुपयांची नोट देण्यचा प्रयत्न केला असता व्यापाऱ्यांनी नाकारल्याने व ग्राहकांकडेही दुसरे पैसे नसल्याने खाली हात परतण्याची वेळ दिसनू आली. बसस्थानकात ५०० रुपयांची नोट चालत असल्याने बसस्थानकावर जावून याचा शोध घेतला असता अनेक वाहक ग्राहकांकडून नोट स्विकारत नसल्याचे दिसून आले तर अनेकजण नोटाही घेतांना आढळून आले. मोठे हॉटेल व्यावसायिक ग्राहकांना सुरुवातीला विरोध करुन काहीजण ग्राहकांकडून पैसे घेत आहेत. रेल्वे स्टेशनवर ग्राहकांकडून ५०० व हजार रुपयांच्या नोटा स्विकारल्या जात आहेत. परंतु ५०० रुपयांची नोट देवून ५० ते १०० रुपयाची तिकीट होत असल्याास चिल्लर आणण्यचे सांगण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनला भेट दिली असता अनेक नागरिकांनी ३०० रुपयांची होणाऱ्या तिकीटाचे ५०० रुपये देवून तिकीट घेतल्याचे दिसून आले. शहरातील अनेक पेट्रोल पंपधारक पैसे घेत असतांना दिलेल्या नोटे एवढे पेट्रोल घेत असल्यासच देत आहेत. कोणी ५०० रुपये देवून २०० रुपयांचे पेट्रोल मागितल्यास त्यांच्याकडून चिल्लरची मागणी केल्या जात आहे. घरगुती गॅस सिलिंडर घरपोच पोहचविणारे मात्र ग्राहकांकडून सदर नोटा स्विकारत नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी काल नोटा बंद झाल्याबरोबर एटीएममधून ४०० रुपये प्रमाणे नोटा काढल्या होत्या त्याचा काहीजण वापर करतांना दिसून येत आहेत.बाजार समित्या बंदअचानक झालेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे कसे चुकवावे याकरिता आज दिवसभर बाजारसमिती बंद होती. तशी कोणतीही सूचना प्रशासनाच्यावतिने नसली तरी शेतकरीचं बाजारात न आल्याने बाजार समितीमधील खरेदी बंद दिसून आली.नाफेड खरेदी केंद्रावर शुकशुकाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु झालेल्या शेतमाल नाफेड खरेदी केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. येथे खरेदीसाठी शेतकरी आल्यास त्याचा माल घेण्यात आला असता परंतु शेतकरी फिरकलाच नाही. तहसीलदारांनी सुध्दा केंद्राला भेट दिलीबैलबाजारात गोंधळशेलुबाजार येथे भरत असलेल्या सर्वात मोठया जनावरांच्या बाजारात आज चांगलाच गोंधळ उडाला. जनावर खरेदी करणार व घेवाल दोघांनीही जनावराचा सौंदा करतांना आधी नोटा कोणत्या देणार याविषयी चर्चा केली नंतरच खरेदी व्यवहार करण्यात आला. यामुळे अनेक जण सौदा न करताच निघून गेले.रेल्वेस्टेशनवर नो प्राब्लमरेल्वेने बाहेरगावी येऱ्जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्यावतिने सदर नोटा घेवून तिकीट दिल्या जात आहे. केवळ १००० रुपयांची नोट देवून शंभर रुपयांच्या तिकीटावेळी चिल्लर मागण्यात येत आहे.
500-1000 च्या नोटा रद्दच्या निणर्यामुळे वाशिम बाजारपेठेत गोंधळ
By admin | Published: November 09, 2016 4:37 PM