शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाजपाकडून राज्यात दंगली भडकवण्याचा प्रयत्न वारंवार झाला; भास्कर जाधवांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 12:21 PM

भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रत्नागिरी - भारतीय जनता पार्टीने राज्यात वेगवेगळे विषय उभे करून दंगल घडवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. कधी कंगना रणौत, सुशांत सिंग राजपूत तर कधी नुपूर शर्मा, काही जणांच्या हाती भोंगा दिला आणि एकाकडे हनुमान चालीसा दिली. नानातऱ्हेने महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे मुख्यमंत्री सर्वजाती धर्माचे लाडके होतायेत त्यासाठी भाजपा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होती असा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. 

भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जाधवांनी भाजपावर हल्लाबोल केला. भास्कर जाधव म्हणाले की, आज मुंबईत सगळीकडे बॅनर्स लागले आहेत. आपले सरकार आले आणि हिंदुचे सणांवरील विघ्न टळले. बेस्ट बस, बसस्टॉपवर आहे. यंदाचा शिमगा, गुढीपाडवा, ईद हे सगळे सण विनाअडथळा सुरू करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले असा टोला जाधवांनी शिंदे-भाजपा सरकारला लगावला. 

बंडखोर आमदार विश्वासघातकी४० आमदारांनी शिवसेनेशी विश्वासघात केला हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही. उद्धव ठाकरेंसारख्या सोज्वल माणसाला ज्यांना राजकारण जमलं नाही त्यांना विश्वासघाताने राजगादीवरून खाली खेचण्यात आले. या अनंत वेदना सगळ्या जातीधर्मातील लोकांमध्ये आहे. शिवसेना आणखी वाढणार आहे. पण तिला योग्य प्रकारे आकार, दिशा देणे, आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे माझं काम असेल असं भास्कर जाधवांनी म्हटलं.

रामदास कदम बेईमान रामदास कदम आहेत कोण? त्यांचा संबंध काय? रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस मी बघितला नाही. ज्याप्रकारे रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल जी भाषा वापरत आहेत. टीका करत आहेत. ते कदम इतके कृतघ्न असतील वाटलं नव्हतं. याच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दसरा मेळावा झाला तेव्हा तुम्ही नेते म्हणून भाषण केले. आज त्याच उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेऊ नये म्हणणं म्हणजे तुम्ही किती उलट्या काळजाचे आहात. तुम्ही किती बेईमान आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे असा घणाघात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला.  

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना