- संजय खासबागे वरुड (अमरावती) : येथून ३५ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत झालेल्या गोटमारीत शंकर भलावी (२५, रा. भुयारी, जि. छिंदवाडा) या तरुणाचा मृत्यू झाला. २२६ जण जखमी झाले. तीनशे वर्षांची ही कुप्रथा बंद करण्यात अपयश येत असल्याने अंधश्रद्धेमुळे यंदाही बळी गेला. या यात्रेत ७१ वर्षांत १२ जण मृत्युमुखी पडले असून हजारो नागरिकांना अपंगत्व आले आहे.सावरगाव येथील युवतीसोबत पांढुर्णा येथील युवकाचे प्रेमसूत जुळले होते. ते विवाहबंधनात अडकणार तेवढ्यात मान-प्रतिष्ठेचा अडथळा निर्माण झाल्याने युवतीला सावरगावातून पांढुर्णा येथे नेत असताना दोन्ही गावांतील लोकांनी त्यांना जांब नदीपात्रात हेरून त्यांच्यावर दोन्हीकडून दगडांचा वर्षाव केला. त्यात दोघे दगावले. चंडिकामातेच्या मंदिरात पूजाअर्चा करून प्रेमीयुगुलाला समाधी देण्यात आली. ही घटना पोळ्याची करीला घडल्याने या दिवशी दोन्ही गावांतील लोक या नदीत गोटमार यात्रा भरवत असल्याची आख्यायिका आहे. दोन्ही आख्यायिका येथील नागरिक श्रद्धेने जोपासतात. या यात्रेत २२६ जखमी झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.>कुप्रथा बंद करण्यात अपयशमध्य प्रदेश प्रशासनाने ही यात्रा बंद करण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या वर्षीसुद्धा पोळ्याच्या करीला विधिवत पळसाचे झाड लावून पूजाअर्चा झाल्यानंतर यात्रा सुरू झाली. त्यानंतर दोन्ही बाजंूकडून एकच दगडांचा वर्षाव सुरू झाला.दगड वर्मावर लागल्याने शंकर भलावीचा बळी गेला. यात जे २२६ जण जखमी झाले ते श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गोटमारी यात्रेत दोन गावांमध्ये होते दगडफेक; अंधश्रद्धेतून गेला तरुणाचा बळी, २२६ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 6:11 AM