दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 01:11 PM2023-10-16T13:11:43+5:302023-10-16T13:13:18+5:30

राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीत सहभागी होऊ शकतो असं मंत्र्यांनी म्हटल्याने हा मोठा नेता कोण आहे याचीच कुजबुज सुरु झाली आहे.

There will be a big political explosion in Dussehra-Diwali Says Shambhuraj Desai; Will Sharad Pawar get another shock? | दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

मुंबई – आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात शिवसेना-राष्ट्रवादी फुटीमुळे राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाविरोधात भूमिका घेत थेट पक्षावर दावा सांगितला आहे. आता पुन्हा एकदा दसरा-दिवाळीत राज्यात आणखी एक राजकीय धमाका होऊ शकतो असा दावा राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे.

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, दसरा-दिवाळी जवळ आलीय त्यामुळे धमाका सुरु झालाय. त्यामुळे कदाचित जसं अजित पवारांच्या नेतृत्वात ९ मंत्र्यांनी शपथ घेतली तसेच पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्रिमडळ विस्तार होईल. शरद पवार गटातील काही नेते महायुतीत येण्यास इच्छुक आहेत. बरेच नेते आहेत त्यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांशी चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय होत असेल म्हणून मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागतोय असं देसाईंनी सांगितले.

त्याचसोबत एखादा मोठा नेता किंवा आमदारांचा एक गट जर महायुतीला समर्थन देण्यासाठी सरकारमध्ये येत असला तर आम्ही त्यांचे स्वागत करू असंही मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाला चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीत सहभागी होऊ शकतो असं मंत्र्यांनी म्हटल्याने हा मोठा नेता कोण आहे याचीच कुजबुज सुरु झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असून दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या २९ मंत्री कॅबिनेट आहेत. त्यातील भाजपचे १०, शिंदे यांच्या शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री आहेत, एकूण मंत्री संख्या जास्तीत जास्त ४३ राहू शकते. याचा अर्थ आणखी चार राज्यमंत्र्यांसह १४ जणांचा समावेश होऊ शकतो.

कोणाला हवी किती मंत्रिपदे?

भाजपला आठ मंत्रिपदे हवी आहेत आणि दोन मित्रपक्षांनी सहा मंत्रिपदे घ्यावीत, असा भाजपचा आग्रह आहे. मात्र, दोन्ही मित्रपक्षांना प्रत्येकी किमान चार मंत्रिपदे हवी आहेत.

Web Title: There will be a big political explosion in Dussehra-Diwali Says Shambhuraj Desai; Will Sharad Pawar get another shock?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.