मराठा आरक्षणावर आता काही चर्चा करून फायदा नाही. ते ओबीसीत येत आहेत. राज्यात एकही मराठा शिल्लक राहणार नाहीय. आता काही चर्चा करून फायदा नाही, असे भुजबळांनी सांगितले.
राठोड हे ओबीसींमध्ये फुट पाडण्याचा गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहेत. आता राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. कुठे दादागिरी करून कुठे काय करून ते मिळविले जात आहेत. यापुढेही ते मिळत राहतील. यामुळे राज्याच एकही मराठा शिल्लक राहणार नाही, असे भुजबळ म्हणाले. विधानसभेबाहेर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.
समितीचे न्यायमूर्ती शिंदे गावागावात जाऊन तुम्ही हे करा, असे पुरावे द्या असे सांगत आहेत. यामुळे सर्व मराठे ओबीसीमध्ये येणार आहेत. ओबीसी आयोगच राहिलेला नाहीय. तो मराठा आयोग झाला आहे, अशी टीकाही भुजबळ यांनी केली.