पुणे : नैर्ऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून माघारी परतला आहे़ महाराष्ट्रात मात्र अजून आठवडाभर परतीच्या पावसाचा मुक्काम असणार आहे़. येत्या १६ व १७ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकणात पनवेल ६०, माथेरान ४०, कर्जत ३०, अंबरनाथ, उल्हासनगर २०, माणगाव, वेंगुर्ला १० मिमी पावसाची नोंद झाली़. मध्य महाराष्ट्रात श्रीगोंदा २०, जामखेड, जत, जुन्नर, खटाव, वडूज, महाबळेश्वर १० मिमी पाऊस पडला़ मराठवाड्यात अंबेजोगाई ३०, लातूर २०, हदगाव, मुदखेड, पारंडा, रेणापूर १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात एटापल्ली येथे १० मिमी पाऊस पडला़. मॉन्सूनचा कर्नाटकातील किनारपट्टी भागातील जोर कमी झाला असून सध्या तो केरळमध्ये सक्रिय आहे़. रविवारी दिवसभरात महाबळेश्वर ११, सातारा २०, सोलापूर ०़७, पुणे ०़८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.१४ व १५ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. १६ व १७ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. .................
१४ ऑक्टोबर रोजी ठाणे, मुंबई, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़ .१६ व १७ ऑक्टोबर रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़. १७ ऑक्टोबर रोजी जालना, परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़ .