मुंबई : दहीहंडीच्या वादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ७२ तासांची मुदत देऊनही त्यांनी मौन सोडलेले नाही. परिणामी, आता गोविंदांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाकडे लक्ष न दिल्याने गोपाळकाल्याच्या दिवशी गोविंदा पथकांनी आयोजकांशिवाय रस्त्या-रस्त्यांवर थर रचण्याचा निर्धार केला आहे.यासंदर्भात गुरुवारी रात्री उशिरा समितीची बैठक पार पडली. आयोजकांवर जाचक अटी लादल्या जात असल्याने उत्सव रद्द करण्यात येत आहेत, असा आरोप समितीने केला आहे. आयोजकांविना उत्सव साजरे करणे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही, अशी भूमिका समितीने घेतली आहे. जे आयोजक उत्सवाचे आयोजन करतील; त्या ठिकाणी गोविंदा पथके थर रचतील, असेही समितीने ठरविले आहे. (प्रतिनिधी)
थरथराट होणारच; गोविंदा आक्रमक
By admin | Published: August 28, 2015 4:48 AM