पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पारंपरिक लेखी पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत.फिजिकल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने निश्चित केले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा बहुपर्यायी, ऑनलाइन इतर पद्धतीने होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यापीठाच्या परीक्षांबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अंतिम वषार्तील विषयांची पारंपरिक पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या विषयांचे निकाल 50 टक्के अंतर्गत गुण व 50 टक्के अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षांच्या एकत्रित मूल्यमापनावर आधारित असतील.अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक मौखिक परीक्षा व्यवहार्यता तपासून अंतर्गत मूल्यमापनात द्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना १२० दिवसांच्या कालावधीत क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी संधी दिली जाणार आहे.----------*परीक्षा अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना 19 मे ते 28 मे दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार.*अंतिम वर्ष वगळता इतर कोणत्याही विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही.*अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी पात्र समजले जाईल.*परीक्षांत संदर्भात कार्यवाही करताना कोविड - १९ प्रादुर्भाव प्रतिबंधक उपाय योजना करणे तसेच यासंदर्भात शासनाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य राहील.