लोणी काळभोर (जि. पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरी आले असताना ओळख करून देण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी वडिलकीच्या नात्याने हात धरून पुढे बोलावले होते. या घटनेचा विपर्यास करणारा फोटो व्हॉट्सअॅप व फेसबुकवर टाकून त्यावर लज्जा उत्पन्न होईल, अशी कमेंट टाकल्याने अज्ञात इसमांविरोधांत संबंधित महिलेच्या वतीने गुरूवारी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.१५ जून रोजी पुणे-नगर महामार्गावरील वाघोली (ता हवेली) येथील एक कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांचे घरी सदिच्छा भेट देण्यासाठी गेले होते. येथे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासमवेत फोटो काढत होते. मुख्यमंत्र्यांबरोबर ओळख करून देण्यासाठी बापट यांनी त्यांना वडिलकीच्या नात्याने हात पकडून पुढे बोलावले. त्या वेळी फोटोग्राफरने सर्वांचे फोटो काढले. व्हॉट्सअॅपवर हा फोटो आक्षेपार्ह कॉमेंट करून टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने तक्रार दिल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी यांनी सांगितले. (वार्ताहर)
‘ते’ छायाचित्र व्हायरल करणाऱ्यांविरोधात तक्रार
By admin | Published: June 17, 2016 2:37 AM