'त्यांना' नियुक्त्या करण्याचा अधिकारच नाही, आव्हाडांनी पक्षाच्या घटनेतील अध्यक्षाचे अधिकारच वाचून दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:30 PM2023-07-03T19:30:11+5:302023-07-03T19:30:45+5:30
आव्हाड म्हणाले, पक्षाध्यक्षांपासून लपवून ते 9 आमदारांना पक्ष विरोधी करवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने, भारतीय सविधानातून निर्माण झालेल्या पक्ष संविधानाच्या कायद्यांवये, त्यांना हा अधिकार राहिलेला नाही. त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने काही वेळापूर्वी पत्रकार परिषदत घेऊन काही नेत्यांच्या नवनियुकत्या केल्या. यात जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून सुट्टी करत, सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. याची घोषणा पक्षाचे कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुक्ल पटेल यांनी केली. यानंतर लगेचच शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटाला, अशा पद्धतीने नियुकत्या करण्याचा अधिकारच नाही, असे म्हटले आहे.
आव्हाड म्हणाले, "काही मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली, असे आम्ही टीव्हीवर पाहिले. त्या पत्रकार परिषदेत अनेक पदे वाटण्यात आली. पण त्याना कायदेशीर संवैधानिक मान्यता होती का? असा प्रश्न आपण विचारला असता तर, याचे उत्तर काय मिळाले असते? त्यांना, अशा नियुक्त्या करण्याची संविधानिक आणि कायदेशीर मान्यताच नाही. कारण, पक्षाच्या घटनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत," असे म्हणत, जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या घटनेत पक्षाच्या अध्यक्षांना असलेले अधिकारच वाचून दाखवले.
तुम्हाला कुठल्याही नेमणुका करण्याचा कायदेशीर अधिकर नाही -
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निलंबनाचे कालचे पत्र दाखवत, "तुम्हाला पक्षातून निलंबित केले असताना, कायदेशीर रित्या तुम्हाला नेमनुका करण्याचा अधिकारच नाही. तुम्ही (प्रफुल्ल पटेल) जरी कार्यकारी अध्यक्ष असलात, तरी तुम्हाला कुठल्याही नेमणुका करण्याचा कायदेशीर अधिकर नाही," असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आव्हाड म्हणाले, पक्षाध्यक्षांपासून लपवून ते 9 आमदारांना पक्ष विरोधी करवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने, भारतीय सविधानातून निर्माण झालेल्या पक्ष संविधानाच्या कायद्यांवये, त्यांना हा अधिकार राहिलेला नाही. त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. तसेच, जयंत पाटील यांची निवड शरद पवार यांनी पक्षाच्या संविधानाप्रमाणे केलेली नियुक्ती आहे. त्यामुळे तुम्ही क्रॉस खेळू शकत नाही," असेही आव्हाड यावेळी म्हणाले.