अकोला, दि. ३0- तेल्हारा येथील विकृत मानसिकता असलेल्या तीन युवकांनी लोखंडी रॉडने हल्ला करीत दोन माकडांना ठार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणात सदर युवकांनी दारूच्या तर्र नशेत ठार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत तीन माकडे गंभीर जखमी झाले. तेल्हारा येथील रहिवासी संतोष माधव खारोडे, गजानन सावळे आणि संतोष किसन खारोडे या तिघांनी दारूचे यथेच्छ मद्य प्राशन केले. त्यानंतर या परिसरात आलेल्या माकडांना एका खोलीत कोंडून त्यांच्यावर तिघांनीही लोखंडी रॉडने हल्ला चढविला. तीनही आरोपींनी दारूच्या नशेत संगनमताने माकडांच्या डोक्यावर हल्ला चढविल्याने या हल्ल्यात दोन माकडांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोन ते तीन माकडे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वन विभागाच्या तक्रारीनंतर तेल्हारा पोलिसांनी सदर तीनही आरोपींविरुद्ध वन्य जीवाच्या शिकारीचा गुन्हा दाखल केला आहे. यामधील संतोष माधव खारोडे, गजानन सावळे हे दोन आरोपी पोलीस कोठडीत असून तिसरा आरोपी फरार आहे. दारूच्या नशेत या तिघांनी हे कांड घडविले असून हे प्रकरण वनविभागाने गांभीर्याने घेतले असून त्यांच्यावर कारवाईचा फास आवळण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे.तीन वर्षांंची शिक्षावन कायद्यामध्ये वन्य जीवांची शिकार केल्याप्रकरणी या तीनही आरोपींना तब्बल तीन वर्षांंची शिक्षा होण्याचे प्रावधान आहे. एवढेच नव्हे तर तीनही आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. मद्यधुंद अवस्थेत केलेल्या या खुनामुळे तीनही आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे.तीनही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून वन विभाग आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहे. या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल. माकडांचा खून करणार्या आरोपींना कठोर शिक्षा तसेच शिकार केल्याप्रकरणी त्यांना शिक्षा व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.- अशोक वायाळवनपरिक्षेत्र अधिकारी
‘त्यांनी’ दारूच्या नशेत केले माकडांना ठार!
By admin | Published: January 31, 2017 2:34 AM