शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध- शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 9:11 AM

संघ, शिवसेना, हिंदुत्त्वावर शरद पोंक्षेचं भाष्य

कल्याण: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यावर भाष्य करताना सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध झाला. त्यांचं आडनाव वेगळं असतं तर वाद झाला नसता, अशी प्रतिक्रिया अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिली. सावरकर यांच्यावरुन होणाऱ्या वादामागे मतपेटीचं आणि जातीयवादाचं राजकारण दडलेलं असल्याचंदेखील ते म्हणाले. कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. सावरकर ब्राह्मण असल्यानं त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र जातीयवाद संपवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कोणालाच दिसत नाही, याबद्दल शरद पोंक्षे यांनी खंत व्यक्त केली. 'सावरकर ब्राह्मण आहेत म्हणून कोणीही येतं आणि त्यांना टपल्या मारुन जातं. त्यांच्या पाठीमागे कोणीच उभं राहत नाही. पण सावरकर वाचल्यानंतर हे लक्षात येतं की ज्या माणसानं जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिजवलं, त्याच माणसाला ब्राह्मण या तीन अक्षरांमध्ये बंदिस्त करुन ठेवलं आहे', असं शरद पोंक्षे म्हणाले.शरद पोंक्षेंनी राष्ट्रीय स्वयंसेक संघ आणि शिवसेनेवरदेखील भाष्य केलं. 'संघात अत्यंत चांगली माणसं घडवली जातात. मीदेखील तिथे होतो. मात्र काही कारणानं बाहेर पडलो. संघात दंड शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. आम्हाला दंड मारायला खूप आवडतात. ते दंड मारायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. म्हणून आम्ही शिवसेनेत गेलो,' असं पोंक्षे यांनी सांगितलं. हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर असल्याचं म्हणत शरद पोंक्षेंनी हिंदुत्वावर त्यांचं मत व्यक्त केलं. 'गर्व कहो से हम हिंदू है म्हटल्यानं इतर धर्मांचा अपमान होत नाही. पण मला माझ्या धर्माचा गर्व आहे. कारण हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर असणं. हिंदू असणं म्हणजेच मनुष्य असणं. हिंदू असणं म्हणजेच मानवतावादी असणं. त्यामुळे आम्ही सेक्युलर आहोत हे वेगळं सांगण्याची गरज लागत नाही,' असं पोंक्षे म्हणाले.  

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरSharad Ponksheशरद पोंक्षेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी