शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
5
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
6
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
7
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
8
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
11
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
12
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
13
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
14
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
15
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
16
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
17
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
18
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
19
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
20
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

‘ते’ निघाले सुरतेला अन् राज्यात उडाली खळबळ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची वर्षपूर्ती  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 8:57 AM

बंडातून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही ३० जून रोजी होत असून येत्या निवडणुकांत जनता या युतीला कसा प्रतिसाद देते, याकडे राज्याचे लक्ष आहे.  

मुंबई : ४० आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची मंगळवारी (२० जून) वर्षपूर्ती होत आहे. सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेने झालेल्या या बंडाच्या प्रवासाने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. बंडातून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही ३० जून रोजी होत असून येत्या निवडणुकांत जनता या युतीला कसा प्रतिसाद देते, याकडे राज्याचे लक्ष आहे.  

बंडापासून सत्ता स्थापनेपर्यंत

२० जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे २५ आमदारांसह गुजरातमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली. उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावत शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीशी असलेली युती तोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची विनंती केली.२१ जून : ३५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदे यांनी दावा केला.२२ जून : शिंदे ४० आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले. मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.२३ जून : एकनाथ शिंदे आणि ३७ आमदारांनी शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषणा केली.२४ जून : शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल करून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिंदे कॅम्पच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. शिंदे यांनी गुजरातमधील वडोदरा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा हेही तेथे असल्याचे सांगण्यात आले.२६ जून : उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्याप्रकरणी शिंदे सर्वोच्च न्यायालयात.२७ जून : सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आणि उपाध्यक्ष झिरवाळ यांना अविश्वास प्रस्तावाबाबत तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.२८ जून : मंत्रिपदावरून भाजप-शिंदे यांच्यात बैठक. २९ जून : देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन फ्लोअर टेस्टची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने ३० जून रोजी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.३० जून : एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना