ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22 : नांदेड येथील पदवीधर शोएब खान याने गर्लफ्रेंड आणि विलासी जीवनवर खर्च करण्यासाठीच चोरीचा मार्ग पकडला. त्याने गेल्या सात-आठ महिन्यात पाच ठिकाणी चोरी केली. नगरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या शोएबकडडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसांना खात्री आहे. २० जानेवारी रोजी दुपारी अजनीतील वंजारीनगरात बिल्डर श्याम शिंगणे यांच्या घरी चोरी करतांना शोएब रंगेहात सापडला होता. शोएबने बीएससी कॉम्प्युटर सायस्न केले आहे. तो अडीच वर्षापूर्वी रोजगारासाठी नांदेडवरून नागपूरला आला होता. तो वर्धमाननगर येथील एका कंपनीत काम करीत होता. त्यचे२२ हजार रूपये मासिक वेतन आहे. कंपनीने राहण्यासाठी फ्लॅट सुद्धा दिला होता. यानंतरही गर्लफ्रेंड आणि विलासी जीवन जगण्याच्या नादात तो चोरी करीत होता.
शोएबच्या दोन गर्लफ्रेंड आहेत एक नांदेडमध्ये तर दुसरी इंदुरमध्ये राहते. तो दोघांच्याही संपर्कात होता. त्यंना वेळोवेळी महागड्या भेट वस्तू द्यायचा. त्याला ब्रांडेड कपडे, महागडे फोन, सिगारेट आणि हॉटेलमध्ये खाण्या पिण्याची सवय आहे. नोकरीच्या भरवश्यावर हे खर्च शक्य होत नव्हते. त्यमुळे त्यने चोरीचा मार्ग अवलंबिला. पहिल्याच प्रयत्नात यशआल्याने त्याची हिम्मत वाढली. तो खांद्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्याप्रमाणे बॅग लकटवून वस्तींमध्ये फिरत असे एखाद्या घराला कुलुप लागलेले दिसताच तो घराची पाहणी करायचा. खिडकीची ग्रिल किंवा कुलून तोडून घरात प्रवेश करून चोरी करायचा. शोएब बोलण्यात तरबेज आहे. चोरी करतांना तो खूप सावध असायचा. घराची पाहणी करतांना कुणी पाहिलेच तर तो पत्ता विचारण्याचा बहाणा करायचा. त्याला पाहून कुणालाही तो कॉलेजचा विद्यार्थी, सेल्समॅन किंवा आॅफीस बॉय असेलअसे वाटायचे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शैलेश शंखे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धोबे करीत आहेत.- साथीदारांना बसला धक्काशोएबचे खरे रूप उघडकीस आल्यावर कंपनीत काम करणाऱ्या त्याच्या साथीदरांना मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला त्यांना यावर विश्वास बसला नाही. परंतू शोएब रंगे हात सापडल्याने आणि त्याच्या इतर गोष्टींचा खुलासा झल्याने सर्वांनाच आश्चर्य बसले.