शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दुष्काळाने उपसरपंचाला बनविले चोर

By admin | Published: June 22, 2016 9:31 PM

यंदाच्या दुष्काळाने बळीराजाला नको नको ते करायला भाग पाडले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 22 - यंदाच्या दुष्काळाने बळीराजाला नको नको ते करायला भाग पाडले. अनेक बागायदारांना मजुरीला जाण्याची वेळ आणली, शेतमजुरांना भीक मागण्याची वेळ आणली, काही शेतकऱ्यांना तर मृत्यूला कवटाळणे भाग पडले... याच दुष्काळामुळे वैजापूर तालुक्यातील शिरसगावच्या अशाच एका माजी उपसरपंच राहिलेल्या प्रतिष्ठित शेतकऱ्याला कर्जबाजारी परिस्थितीने चक्क चोर बनावे लागले...राजेंद्र साहेबराव डुसिंग (४८, रा. शिरसगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ग्रामसेवकाच्या घरात घुसून जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यात सायबर क्राईमच्या पथकाने त्यांना अटक केली. त्याचे झाले असे की, वाळूज परिसरातील शिवराई येथील सुरेखा कुंजर या १७ जून रोजी दुपारी आपल्या घरात बसलेल्या होत्या. अचानक हेल्मेट परिधान केलेला एक व्यक्ती मोटारसायकलवर त्यांच्या घरासमोर आला. मोटारसायकल उभी करून तो घरात आला. आत येताच ह्यकाय वहिनी ओळखले का?ह्ण असे म्हणत त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावर हेल्मेट असल्यामुळे सुरेखा कुंजर यांनी त्यांना ओळखले नाही; परंतु पाणी आणून दिले. घरात कुणी नसल्याची संधी साधून ह्यत्याह्ण हेल्मेटधारीने चाकू काढला आणि ह्यगप्प बसा, आरडाओरड केली तर ठार मारीनह्ण अशी धमकी देऊन कुंजर यांच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. तसेच घरात असलेला मोबाईल व एक हजार रुपयेही लुटले आणि क्षणभरात ही लूट करून मोटारसायकलवर पसार झाला. भरदिवसा घडलेल्या लुटमारीच्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या जबरी चोरीप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात हेल्मेटधारीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. तांत्रिक पुराव्याआधारे पोलिसांना सापडला माग...या घटनेत मोबाईल चोरीस गेला होता. त्यामुळे सायबर क्राईमचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, फौजदार आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक बाबीने या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू केला. अखेर हा गुन्हा शिरसगावातील माजी उपसरपंच असलेल्या राजेंद्र डुसिंग या शेतकऱ्याने केल्याची पक्की माहिती आणि पुरावे पोलिसांना सापडले. त्यारून सायबर क्राईमचे पथक काल आरोपी राजेंद्रपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्यांस अटक केली. अटकेनंतर लगेच आरोपीने ह्यहोय, साहेब परिस्थितीमुळे मी हा गुन्हा केलाह्ण अशा स्पष्ट शब्दात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे गंठण, मोबाईल व गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली. अटकेनंतर पोलिसांनी जेव्हा राजेंद्र डुसिंग यांची कथा ऐकली तेव्हा पोलिसांनाही वाईटच वाटले. आपल्याला केवळ परिस्थितीमुळे हे वाईट कृत्य सुचल्याचे डुसिंग यांनी सांगितले. एक तर दुष्काळामुळे यंदा काहीच पिकले नाही. त्यामुळे शेतीतून उत्पन्न तर आलेच नाही, उलट नुकसान झाले. त्यातच काही महिन्यांपूर्वी मुलीचा विवाह करण्यासाठी बराच खर्च झाला. मुलीचे लग्न, दुष्काळ यामुळे आपण कर्जात बुडालो होते. उपजीविकेसाठी आणि कर्ज फेडण्यासाठी काय करावे, या चिंतेने ग्रासल्या गेलो. त्यातूनच ही दुर्बुद्धी सुचल्याचे डुसिंग यांनी पोलिसांना सांगितले. उसने पैसे आणण्यासाठी गेलो अन्...वास्तविक पाहता आपण कुंजर यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने गेलोच नव्हतो. उसने पैसे मागण्याच्या उद्देशाने गेलो होतो, असे आरोपी राजेंद्र डुसिंग यांनी पोलिसांना सांगितले. डुसिंग हे उपसरपंच असताना सुरेखा कुंजर यांच्या घरचे शिरसगावला ग्रामसेवक होते. त्यामुळे कुंजर आणि डुसिंग यांची चांगली ओळख होती. हलाखीच्या परिस्थितीत कुंजर आपल्याला काही आर्थिक मदत करू शकतात, असे वाटल्याने आपण उसने पैसे मागण्याच्या इराद्याने त्यांच्या घरी गेलो. तेथे गेल्यानंतर घरात कुणी नसल्याचे पाहून परिस्थितीने इरादा बदलला. हेल्मेट घातलेले असल्यामुळे कुंजर यांच्या घरच्यांनी ओळखले नाही, तेव्हा आता पैसे लुटले तर आपण पकडल्याही जाणार नाही आणि आपले कामही होऊन जाईल, असा विचार मनात आला आणि मग लूट केल्याचे डुसिंग यांनी पोलिसांसमोर कबूल केले. डुसिंग यांनी सांगितल्याप्रमाणेच परिस्थिती आहे का, याचाही पोलीस आता तपास करीत आहेत.