अजित पाटील, उरण : उरण पोलिसांच्या आवारातील मुद्देमाल कक्षाचे कुलूप तोडून मुद्देमालाची ट्रंक फोडून त्यामधून २८ लाख ९२ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली. एनएडीच्या कामगारांनी केलेल्या अपहाराची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली होती. त्याच्या व त्याच्या साथीदारांकडून पोलिसांनी सुमारे ३३ लाखांची रक्कम वसूल करून आपल्या मुद्देमाल कक्षात ठेवली होती. मात्र या रकमेवरच चोरांनी डल्ला मारला. बुधवारच्या रात्री १२ नंतर ते गुरुवारच्या दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडलेल्या या प्रकाराने उरण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर न्हावाशेवा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे हे उरण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेतउरण पोलीस ठाण्याच्या आवारातच असलेल्या चाळीमध्ये पोलिसांचा मुद्देमाल कक्ष आहे. या कक्षात विविध गुन्ांमधील रोख रकमा आणि दागिने ठेवण्यात आले होते. यापैकी तीन पाकिटांत ठेवलेल्या १२, १० आणि २० हजार या रकमेसह एनएडीच्या कामगाराने केलेल्या फसवणुकीच्या गुन्ातील २८ लाख ५०,००० अशी एकूण २८ लाख ९२ हजारांची रोकड चोरट्याने चोरून नेले. मुद्देमाल कक्ष पोलीस ठाण्याच्या आवारात असला तरीही गार्डचा माणूस हा आरोपींच्या सुरक्षेसाठी असतो. त्यामुळे मुद्देमाल कक्षासाठी वेगळा असा गार्ड देता आला नसल्याने चोरांचे फावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एनएडीच्या कामगाराने केलेल्या फसवणुकीच्या गुन्ातील ही रक्कम एनएडीच्या अधिकार्यांना सुपुर्द करण्याबाबतचा अर्ज उरण पोलीस ठाण्याने २८ एप्रिललाच उरण कोर्टाला सादर केला आहे. मात्र त्यावर कोणताही आदेश झाला नसल्याने ही रक्कम मुद्देमाल कक्षातल्या पेटीत ठेवण्यात आली होती. पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलिसांच्या ताब्यात असणार्या मुद्देमाल कक्षातून झालेल्या या चोरीचा कसून तपास करण्यात येत असून दोन दिवसांत या गुन्ाची उकल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे एसीपी शशिकांत बोराटे व पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास क्राइम विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. (वार्ताहर)
चोरांनी मारला पोलीस ठाण्यावर डल्ला
By admin | Published: May 09, 2014 9:13 PM