शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

राज्यात चोऱ्यामाऱ्यांना ऊत

By admin | Published: May 24, 2017 2:37 AM

राज्यातील दरोडे, मारहाण करून चोरी करण्याच्या गुन्ह्यांचा कल आणि त्यांचे विश्लेषण पाहता असे गुन्हे रात्री ८ ते १२ दरम्यान सर्वाधिक घडत असल्याचे दिसून आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील दरोडे, मारहाण करून चोरी करण्याच्या गुन्ह्यांचा कल आणि त्यांचे विश्लेषण पाहता असे गुन्हे रात्री ८ ते १२ दरम्यान सर्वाधिक घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे प्रमाण २४ तासांमध्ये याच वेळेत ४१ टक्के आहे. त्यातही चोऱ्या २४ तास सातत्याने होत असून, मंगळवार हा त्यादृष्टीने नागरिकांसाठी घातवार ठरतो आहे.दरोडेखोर दुपारी १२ ते ४ किंवा रात्री ८ ते १२ याच वेळेच्या मर्यादेत गुन्हे करताना दिसून आले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. दरोडे आणि जबरी चोरीचे प्रमाण दुपारी १२ ते ४ या वेळेत २२ टक्के झाले आहे. त्यानंतर सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत या गुन्ह्यांचे प्रमाण समान, ११ टक्के असून रात्री १२ ते पहाटे ४ दरम्यान ७ टक्के गुन्हे होत आहेत. रात्री ८ ते १२ दरम्यान जबरी चोरीचे ४७ आणि दरोड्याचे ५० गुन्हे पोलिसांकडे दाखल झाले. दुपारी १२ ते ४ दरम्यान जबरी चोरीचे २६ गुन्हे दाखल होते. या वेळेत दरोडा पडल्याची नोंद उपलब्ध नाही. सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यानही जबरी चोरीचे प्रत्येकी १३ गुन्हे दाखल असून दरोड्यांचे प्रमाण शून्य आहे. रात्री १२ ते पहाटे ४ दरम्यान मारहाण करून चोरी केल्याचे १० गुन्हे दाखल झाले. पहाटे ४ ते ८ दरम्यान याच प्रकारचे ८ गुन्हे दाखल झाले. ९ ते १५ एप्रिल दरम्यानच्या आठवड्यामध्ये ६ दरोडे आणि ११७ चोरीचे गुन्हे दाखल झाले. जबरी चोरीच्या ११७ गुन्ह्यांपैकी ४३ गुन्हे (२९ टक्के) सोनसाखळी चोरीचे आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने दरोडे आणि मारहाण करून चोऱ्या होण्याचे वारानुसार विश्लेषण केले असता सर्वाधिक २१ टक्के (१ दरोडा २५ चोऱ्या) गुन्हे बुधवारी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर रविवारी १८ टक्के (२ दरोडे, २० चोऱ्या), सोमवारी १६ टक्के (१ दरोडा, २० चोऱ्या), मंगळवारी १४ टक्के (० दरोडा, १७ चोऱ्या), शनिवार व गुरुवारी प्रत्येकी ११ टक्के (१ दरोडा, १२ चोऱ्या) आणि शुक्रवारी ९ टक्के (१ दरोडा, १० चोऱ्या) असे प्रमाण आहे.राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अनेक जिल्ह्यांकडून दरोडे आणि जबरी चोरीसह विविध गुन्ह्यांचा तपशील मागविला होता. ९ ते १५ एप्रिलदरम्यान तसेच त्याआधीच्या ५ आठवड्यांच्या जबरी चोरी आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांचा एकत्रित अभ्यास केला असता सर्वाधिक दरोडे रात्री ८ ते १२ या वेळेत आणि सर्वाधिक जबरी चोरीचे गुन्हेही याच वेळेत झाले आहेत. ५ आठवड्यांच्या विश्लेषणामध्ये सर्वाधिक दरोडे रविवार आणि सोमवारी पडल्याचे दिसून येते, तर सर्वाधिक चोरीचे गुन्हे मंगळवारी झाले आहेत.