शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

चोर-पोलीस खेळ सुरूच!

By admin | Published: January 11, 2016 1:33 AM

चोरी, घरफोडीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असल्या, तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मात्र आले नाही.

पिंपरी : चोरी, घरफोडीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असल्या, तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मात्र आले नाही. हिंजवडीत सराफा व्यापाऱ्याची हिऱ्यांची बॅग पळविल्याचा प्रकार, एचडीबी फायनान्समधील ७० तोळे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना, चिखलीतील भरदिवसा झालेली घरफोडी या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या, तरीही पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्तहोत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी महिला स्वच्छतागृहाची खिडकी उचकटून एचडीबी फायनान्समधून सुमारे साडेअकरा लाखांचे ७० तोळे सोने चोरून नेले. मुंबई-पुणे महामार्गालगतच ही इमारत असून, येथील काही दुकाने मध्यरात्री १२पर्यंत सुरू असतात. एचडीबी फायनान्ससह इतर कंपन्यांच्या फायनान्सची कार्यालये या ठिकाणी आहेत. सुरक्षिततेसाठी येथील बहुतांश दुकानदारांनी सीसीटीव्ही यंत्रणाही बसविली आहे, तर काही दुकानदारांनी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवली आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या या परिसरात एचडीबी फायनान्समधील चोरीच्या प्रकारामुळे शहरातील इतरही बँकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेसंदर्भात सीसीटीव्ही असून, फुटेज मिळूनही पोलिसांना चोरट्यांचा छडा लावण्यात विलंब येत आहे. एचडीबी फायनान्स चोरीप्रकरणी पोलिसांनी फुटेजनुसार संशयित म्हणून काही सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर सोडून दिले गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.अशाच प्रकारे हिंजवडीमधील सराफाची हिऱ्यांची बॅग चोरट्याने लंपास केल्याचीघटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असूनही, चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सुरक्षारक्षकालाच मारहाण करून चोरट्यांनी मुद्देमाल पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. (प्रतिनिधी)मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात दिवसा व रात्री मिळून एकूण १९१ घरफोड्या झाल्या. यामध्ये फक्त ६३ घटना उघडकीस आल्या. दरम्यान, दिवसा झालेल्या घरफोड्यांची संख्या ४६ होती. यामध्ये १० घटनांचा छडा लावण्यात पोलीस अयशस्वी झाले आहेत. बहुतांश व्यावसायिकांकडून सीसीटीव्ही बसविण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र, एचडीबी फायनान्स, सराफाची बॅग चोरीला गेल्याची घटना, यासह हिंजवडी, तळवडे येथे दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटना सीसीटीव्हीत कैद होऊनही चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना हे फुटेज कामी आलेले नाही. गेल्या वर्षी घडलेल्या काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होऊनही अद्याप त्या घटना उघडकीस येऊ शकलेल्या नाहीत.