शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

नवभारत निर्मितीचा गांभीर्याने विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 1:09 AM

अनिल काकोडकर : शिवाजी विद्यापीठाच्या ५३ व्या दीक्षान्त समारंभात सोनाली बेकनाळकर, स्नेहल चव्हाण यांचा गौरव

कोल्हापूर : भविष्यातील नवभारताच्या निर्मितीसाठी गांभीर्यपूर्वक विचार करून नवसंशोधन, तंत्रज्ञान अशा आवश्यक बाबींचा वेध घेऊन त्याअनुषंगाने आपली भूमिका, कार्यशैली युवावर्गाने ठरवावी, असे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५३ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. विद्यापीठातील लोककला केंद्रातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते कोल्हापुरातील सोनाली बेकनाळकर या विद्यार्थिनीला सन २०१५-१६ मध्ये कला, क्रीडा, बौद्धिक या क्षेत्रांसह एनसीसी, एनएसएस यांतील गुणवत्ताप्राप्त तसेच व्यक्तिमत्त्व, वर्तणूक व नेतृत्वगुण याबाबतचे विद्यापीठाचे सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते साताऱ्यातील स्नेहल चव्हाण हिला एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणात पार पडलेल्या या दीक्षान्त समारंभात ४९ हजार ९५१ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. डॉ. काकोडकर म्हणाले, जगाच्या सर्वांगीण विकासासाठी कसे योगदान देता येईल याचा विचार युवा वर्गाने करावा. या विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी देश, समाज, उद्योग आदींच्या पलीकडे जाऊन कार्यरत राहावे. उच्चशिक्षणातील बदलती क्षितिजे काबीज करण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी वार्षिक अहवाल सादर केला तसेच पत्रकारिता विभागातील ग. गो. जाधव अध्यासन स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, नव्या जगात व युगात पदवीधर यापुढे प्रवेश करणार आहेत. हे नवे जग वेगवान, जागतिक स्पर्धेचे आहे. त्यात टिकून राहण्यासाठी पदवीसह जीवन आणि तंत्रकौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी दुपारी अडीचच्या सुमारास परीक्षा नियंत्रक महेश काकडे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले. कार्यक्रमास ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. शिवराम भोजे, माजी कुलगुरु डॉ. एस. एच. पवार, प्रा. एन. व्ही. नलवडे, शिरीष पवार, आर. नारायणा, पी. एस. पाटणकर, एस. एच. सावंत, पी. एस. पाटील, प्राचार्य हिंदुराव पाटील, डॉ. रूपा शहा, उदय गायकवाड, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पदव्यांचे वाचन केले. आलोक जत्राटकर, आदित्य मैंदर्गीकर, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)ग्रामीण विकासाचा सुधारित आराखडा उत्पादकतेच्या जोरावर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न शहरी भागाच्या निम्मे असल्याचे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान असणाऱ्या ग्रामीण कुटुंबांपैकी केवळ ९.७ टक्के कुटुंबांना नियमित वेतन मिळते; तर ५६ टक्के नागरिक भूमिहीन आहेत. जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी ग्रामीण विकासाचा सुधारित प्रारूप आराखडा तयार करावा लागेल. ग्रामीण, दुर्गम भागांतील नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी कमी खर्चात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपल्या देशासह इतर विकसनशील राष्ट्रांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.डॉ. काकोडकर म्हणाले...नवउद्योजकता निर्माण करणारी पिढी शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी घडवावी.युवकांनी रोजगार मागणारे नको, तर रोजगार निर्माते बनावे.उच्च शिक्षणातील अध्ययन प्रक्रियेत संशोधनाला पूरक वातावरण, दर्जेदार कौशल्यनिर्मिती, मूलभूत मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी पोषक वातावरणाचा अभावतंत्रज्ञानासाठी आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावे लागते. ते अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे. क्षणचित्रे२२ हजार ३३७ स्नातकांनी स्वीकारली प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी. विविध विद्याशाखांतील एकूण २५८ संशोधक विद्यार्थिनींना पीएच. डी. व एम. फिल. पदवी प्रदान.विविध गुणवत्ताप्राप्त ८७ विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर पारितोषिके देऊन सन्मान.दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण.