अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 12:33 PM2024-10-27T12:33:02+5:302024-10-27T12:50:19+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
NCP Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या तिसऱ्या यादीत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या आधी अजित पवार यांनी दोन याद्यांची घोषणा केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्याविरोधातील उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तसेच महायुतीत दहा जागांवर चर्चा सुरु असून त्याचा निर्णय दुपारपर्यंत येण्याची शक्यता सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत देखील नवाब मलिक यांचे नाव नाहीये. त्यामुळे नवाब मलिक यांना संधी दिली जाणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याबाबतही सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे सहकारी आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटत असतो, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
तिसऱ्या यादीमध्ये गेवराईमधून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अजित पवार गटाचे ५० उमेदवार जाहीर
अजित पवार- बारामती
दिलीप वळसे पाटील- आंबेगाव
सुलभा खोडके- अमरावती
दत्ता भरणे- इंदापूर
अण्णा बनसोडे-पिंपरी
निर्मला विटेकर-पाथरी
सुनील शेळके-मावळ
छगन भुजबळ- येवला
हसन मुश्रीफ-कागल
माणिकराव कोकाटे- सिन्नर
नरहरी झिरवळ - दिंडोरी
धनंजय मुंडे - परळी
दौलत दरोडा - शहापूर
हिरामण खोसकर - इगतपुरी
अनिल पाटील - अमळनेर
संग्राम जगताप - अहमदनगर
आदिती तटकरे - श्रीवर्धन
संजय बनसोडे- उदगीर
बाबासाहेब पाटील - अहमदपूर
दिलीप मोहिते-पाटील - खेड-आळंदी
राजकुमार बडोले - अजुर्नी मोरगाव
प्रकाश सोळंखे - माजलगाव
मकरंद पाटील - वाई
आशुतोष काळे - कोपरगाव
इंद्रनील नाईक - पुसद
भरत गावित - नवापूर
नजीब मुल्ला - मुंब्रा-कळवा
किरण लहामटे - अकोले
शेखर निकम - चिपळूण
यशवंत माने - मोहोळ
राजेश पाटील - चंदगड
हिरामण खोसकर - इगतपुरी
राजू कारेमोरे - तुमसर
चंद्रकांत नवघरे - वसमत
नितीन पवार - कळवण
धर्मराव बाबा आत्राम - अहेरी
अतुल बेनके - जुन्नर
चेतन तुपे - हडपसर
सुनिल टिंगरेंना - वडगाव शेरी
सना मलिक - अणुशक्तीनगर
संजयकाका पाटील - तासगाव कवठे महांकाळ
निशिकांत पाटील - इस्लामपूर
ज्ञानेश्वर कटके - शिरूर
झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व
प्रताप चिखलीकर - लोहा कंधार
गेवराई - विजयसिंह पंडित
फलटण- सचिन पाटील
निफाड - दिलीपकाका बनकर
पारनेर - काशिनाथ दाते