शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

साठ हजारांतच पडणार गळ्यात विजयाची माळ

By admin | Published: October 02, 2014 9:50 PM

आठही मतदारसंघांतील चित्र : मतदान खेचण्यासाठी उमेदवारांच्यातच रस्सीखेच

मोहन मस्कर-पाटील- सातारा -राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढल्या. पंधरा वर्षांपूर्वींचा हा इतिहास पुन्हा एकदा नव्याने घडणार आहे. सातारा जिल्हाही त्याला अपवाद ठरलेला नाही. पंधरा वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि या कालावधीत झालेली मतदारसंघ पुनर्रचना अन् वाढलेले मतदार लक्षात घेता विजयी उमेदवारांचा ‘व्हिक्टरी शॉट’ ६० ते ६५ हजार मतदान असणार आहे. सरासरी प्रत्येक मतदारसंघात होणारे पंचाहत्तर टक्के मतदान लक्षात घेता एवढे मतदान मिळाले, तर विजयाची माळ उमेदवाराच्या अलगद गळ्यात पडणार आहे. शरद पवार यांनी तत्कालीन परिस्थितीत काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने नऊ तर काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली होती. १९९९ ची निवडणूक आणि २०१४ ची निवडणूक यामध्ये मोठे अंतर असले तरी त्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर विजयाचे गणित किती मतांचे असेल, याचे चित्र स्पष्ट होते. राष्ट्रवादीच्या नऊ आणि काँग्रेसच्या एका विजयी उमेदवाराला पडलेली मते ही सरासरी ५२ ते ६३ हजार तर विजयी मते २ ते ३६ हजार आहेत. १९९९ मध्ये राष्ट्रवादीला येथे अनपेक्षित आणि धक्कादायक असे यश मिळाले. या यशाची अपेक्षा राष्ट्रवादीनेही कधी केली नव्हती. तरीही त्यांना ते मिळाले. अभयसिंहराजे भोसले, मदनराव पिसाळ आणि विक्रमसिंह पाटणकर यांच्या विजयाची मते पाच हजारांच्या आत आहेत. आता परिस्थिती जरी बदलली असली तरी मतदानाची सरासरी मात्र तीच राहणार आहे. काही ठिकाणी मतदानाचा टक्का वाढू शकतो, ही बाबदेखील नाकारून चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघातील मतदान सरासरी तीन लाख आहे. चौरंगी अथवा पंचरंगी लढतीत प्रत्येक मतदारसंघातील विजयी उमेदवाराला ६० हजार अथवा त्यापेक्षा अधिक मतदान मिळाले, तर त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी साठ हजार मतदान कसे मिळले, याकडे लक्ष दिले आहे. स्वतंत्र लढतींमुळे चुरसआजमितीस जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांत २३ लाख ५९ हजार ४१३ इतके मतदान आहे. सर्वाधिक ३.१४ लाख मतदान वाई तर सर्वात कमी २.७४ लाख मतदान कऱ्हाड उत्तरमध्ये आहे. लोकसभेला झालेले मतदान ५६.५७ टक्के होते. यात फलटण आणि माणचा समावेश नव्हता. विधानसभा निवडणुकीला चित्र वेगळे असते. निवडणुकीचे क्षेत्र मर्यादित असल्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यास आवश्यक तेवढा वेळ मिळतो आणि मतदानही वाढते. त्यातच प्रत्येक पक्षांनी शड्डू ठोकल्यामुळे चुरस वाढणार आहे. परिणामी मतदानाचे प्रमाण ७५ टक्के अथवा त्याहून अधिक असणार आहे.मतदारसंघाचे विभाजनपुनर्रचनेनंतर अनेक मतदारसंघाचे विभाजन झाले. दहापैकी फक्त आठच मतदारसंघ राहिले. जावळी आणि खटाव विधानसभा मतदारसंघ रद्द झाला. पूर्ण जावळी तालुका सातारा मतदारसंघाला जोडला, तर खटाव मतदारसंघाचे त्रिभाजन कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि माण मतदारसंघात झाले. कोरेगावचा काही भाग कऱ्हाड उत्तर आणि फलटणला जोडला. सातारा तालुक्यातील काही गावे कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तरला जोडली. कऱ्हाड दक्षिणमधील दोन गट पाटण मतदारसंघाला जोडले.पाटणचे गणित पाच हजारांच्या आतचपाटण मतदारसंघातील लढत ही नेहमीच पाटणकर विरुद्ध देसाई अशीच राहिली आहे. १९८३ ते १९९० या कालावधीत झालेल्या तीन निवडणुकांत (यापैकी एक पोटनिवडणूक) विक्रमसिंह पाटणकर फक्त १९९0 च्या निवडणुकीतच २२,६४४ मते घेऊन विजयी झाले. १९९५ मध्ये पाटणकर ७३६ मताने विजयी झाले. १९९९ मध्ये ते २५६३ मतांनी विजयी झाले आणि २00४ मध्ये ५८५१ मतांनी पराभूत झाले. २00९ मध्ये पाटणकर अवघ्या ५८0 मताने विजयी झाले. यात आघाडी असल तरी काँग्रेसने पाटणकरांच्या विरोधात काम केल्याचा आरोप झाला होता. यावेळी काँग्रेस स्वतंत्र लढते आहे. शिवसेनाही मैदानात आहे. पाटणकरांचे पूत्र सत्यजितसिंह राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत. परिणामी काँग्रेसच्या मतविभागणीचा फायदा कोणाला होतो, हे पाहणे उचित ठरणार आहे. गेल्या अनेक निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता येथील विजयाचे गणित हे एक हजार ते पाच हजार मतांच्या आतच असणार आहे.राष्ट्रवादी आणि काँग्रेस १९९९ मध्ये स्वबळावर लढली त्यावेळचे चित्रपक्ष / उमेदवारमतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेसपडलेली मतेविरोधी उमेदवारपडलेली मतेमताधिक्यफलटणरामराजे नाईक-निंबाळकर६३९६0चिमणराव कदम३२१८0३६९६0वाईमदनराव पिसाळ४३१८१मदन भोसले४१३२६१८५५कोरेगावशालिनीताई पाटील६१६९२शंकरराव जगताप३६0६९२५६२३माणतुकाराम तुपे४५९९३धोंडिराम वाघमारे३४८७६११११७कऱ्हाड उत्तरबाळासाहेब पाटील५९४२७आनंदराव पाटील४२३२२१७१0५कऱ्हाड दक्षिणविलासराव पाटील-वाठारकर३९१६१विलासराव उंडाळकर६२७९५२३६३४पाटणविक्रमसिंह पाटणकर५३३३६शंभूराज देसाई५0७७३२५६३साताराअभयसिंहराजे भोसले५९७८0उदयनराजे भोसले५४४१७५३६३(सातारा जिल्ह्यात कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ वगळता उर्वरित नऊ मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. पाटणमध्ये शिवसेनेकडून शंभूराज देसाई तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार होते. )