शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 4:36 PM

Dharavi Redevelopment Latest News in Marathi : केंद्र सरकारने २५६ एकर जमीन धारावी पुनर्विकासासाठी देण्यास संमती दिली आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एनडीए सरकारला सुनावले आहे.

Varsha Gaikwad On dharavi redevelopment project adani : 'मुंबईचे भविष्य हे विक्रीसाठी नाही. आम्ही मोदानी लूटविरुद्ध लढू आणि जिंकू', असा संताप व्यक्त मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. धारावीतील अपात्र असलेल्या लोकांसाठी घरे उभारण्यासाठी मिठागराची २५६ एकर जमीन देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सरकारवर टीका केली. 

वर्षा गायकवाड यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी मिठागराच्या जमिनीवर बांधकाम केल्यास मुंबईला पुराचा धोका निर्माण होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

वर्षा गायकवाड यांचे म्हणणे काय?

"मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका या महाभ्रष्ट सरकारची आहे", अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली. 

वर्षा गायकवाड यांनी अदानींच्या प्रकल्पावरून मोदींवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, "धारावीकरांचा, मुंबईकरांचा आणि पर्यावरणवादी यांचा प्रखर विरोध असताना, या मोदानी सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहेत."

धारावीकरांना धारावीतच घरे द्या -गायकवाड

"आणि कारण काय? 'अपात्र' धारावीकरांसाठी घरे! आम्ही आधीच स्पष्ट केले आहे की, आम्हाला पात्र-अपात्र मान्य नाही. प्रत्येक धारावीकराने ही धारावी आपल्या रक्त आणि घामाने उभी केली आहे, त्यामुळे पात्र-अपात्रचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व धारावीकरांना धारावीमध्येच घरे मिळाली पाहिजेत", अशी मागणी त्यांनी केली आहे.  

"आधी हिरवळ आणि सार्वजनिक मोक्याच्या जागा मोदानीच्या हाती सोपवण्याच्या विरुद्ध रहिवाशांनी केलेल्या विरोधानंतर, आता पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागर जमिनी त्यांच्या हाती सोपवल्या जात आहेत", असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

"हे पर्यावरण संरक्षण कायद्याच्या विरोधात" "मुंबईत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिठागरे महत्त्वाची भूमिका बजावतात. ही मिठागरे दर पावसाळ्यात कोट्यवधी लीटर पाणी आपल्या पोटात साठवतात. मुंबईकरांना पुराचा फटका बसण्यापासून वाचवतात. तेव्हा मिठागरांच्या जमिनीवर भराव घालून तिथे इमारती उभारल्या, तर शहराला भयंकर पुराचा धोका अधिक संभवतो. पर्यावरणदृष्ट्या, खारफुटी जमिनींवर सरसकट बांधकाम परवानगी देण्याचे भयंकर परिणाम होणार आणि असे करणे पर्यावरण संरक्षण कायद्याच्याही विरोधात आहे", असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.  

"धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव घेऊन हे केवळ प्रचंड प्रमाणात भूमी बळकावण्याचेच कारस्थान आहे. हे विकास नव्हे तर, मुंबईकरांची लूट आहे. मुंबईचे भविष्य हे विक्रीसाठी नाही. आम्ही मोदानी लूटविरुद्ध लढू आणि जिंकू", असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला. 

टॅग्स :Mumbaiमुंबईdharavi-acधारावीVarsha Gaikwadवर्षा गायकवाडNarendra Modiनरेंद्र मोदीAdaniअदानीMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार