मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही. संयम आणि शांततेच्या मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन करत शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी गृह खात्याला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत आरक्षणासंदर्भात गोड बातमी मिळेल. यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवलं जावू शकते, असेही शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष निवडणूक आयोगाच्या यादीत अधिकृत नसल्याने त्यांना बोलवलं नाही. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची मागणी आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांवर टिका करू नये, असा सल्ला शहाजी पाटील यांनी दिला आहे.
सरकार पडेल याकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे डोळे लागले आहेत. परंतु संजय राऊत यांचे यापूर्वीच विसर्जन झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांना राज्याच्या विकासासाठी दिल्लीला जावे लागतं. याला विरोधकांकडून राजकीय रंग दिला जात असल्याचे शहाजी पाटील यांनी सांगितले.