आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे यामागे भाजपचा हात असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. अशातच काँग्रेसचा नेता कन्हैय्या कुमारनं भाजपवर निशाणा साधला आहे.
हे ऑपरेशन ‘Lotus’ नाही, ‘Loot-Us’ आहे, असं ट्वीट करत कन्हैय्या कुमारनं भाजपवर निशाणा साधला. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. शिवसेनेला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.