...तर आम्ही भाजप नेत्यांचे अभिनंदन करू - थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 07:39 AM2020-10-21T07:39:12+5:302020-10-21T07:39:18+5:30

कोरोनामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.

Thorat says so we will congratulate the BJP leaders | ...तर आम्ही भाजप नेत्यांचे अभिनंदन करू - थोरात

...तर आम्ही भाजप नेत्यांचे अभिनंदन करू - थोरात

Next

मुंबई : राज्यातील भाजपाचे नेते सध्या मोठ्या मागण्या करत आहेत; पण केंद्र सरकारकडे असलेले जीएसटीचे ३० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर आम्ही त्यांचे अभिनंदन करू, असा टोला महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

कोरोनामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, तो अद्याप केलेलाच नाही. सप्टेंबर अखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत ते तरी त्यांनी आधी द्यावेत, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

राज्य सरकारला पगार आणि इतर दैनंदिन खर्चासाठी लागणारा ५५ हजार कोटी रुपयांचा निधी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून उभारला आहे. कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे. महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते परंतु राज्याला मात्र मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो, असा आरोपही थोरात यांनी केला आहे.
 

Web Title: Thorat says so we will congratulate the BJP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.