‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 08:34 AM2024-10-05T08:34:47+5:302024-10-05T08:35:09+5:30
गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा फोडाफोडीच्या राजकारणाकडे अधिक लक्ष असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरद पवार यांना सोडून महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या त्या नऊ जणांना पुन्हा पक्षात घ्यायचे नाही, असे आमच्या पक्षाने ठरविले आहे, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
देशमुख म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळेच बदलापूरसारख्या घटना घडत आहेत. आरोपी हा कुठलाही पक्षाचा असो; त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा फोडाफोडीच्या राजकारणाकडे अधिक लक्ष असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
अजित पवार स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतात
अजित पवार गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे भाजप अजित पवार यांना कधीही सांगू शकते; त्यामुळे ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात, अशी परिस्थिती असल्याचेही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.