शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उच्च न्यायालयाने टोचले राणेंचे कान; महाराष्ट्रात राजकारणाची परिपक्व परंपरा  - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:30 PM

हे सल्लागार अधिकारक्षेत्र नाही. परंतु, याचिकाकर्ते (नारायण राणे) हे जबाबदार पदावर आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धुळे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कठोर कारवाई करणार नाही, असे विधान करू शकता का? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी याबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.महाराष्ट्रात राजकारणाची परिपक्व परंपरा आहे. त्यामुळे तुमच्या अशिलांना (नारायण राणे) आदराने वागण्यास सांगा, अशी चपराकही न्या. पी. बी. वराळे व न्या. एस. एम. मोदक यांच्या खंडपीठाने सुनावणीवेळी लगावली. हे सल्लागार अधिकारक्षेत्र नाही. परंतु, याचिकाकर्ते (नारायण राणे) हे जबाबदार पदावर आहेत. निश्चितपणे त्यांनी वापरलेले शब्द आदरणीय स्थानावर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या आदराप्रित्यर्थ नाहीत. याचिकाकर्ते पुढाकार घेऊन का सांगत नाही की, जे झाले ते गेले आणि एकमेकांशी सन्मानपूर्वक वागण्याचे ठरवू... लोकांना चुकीचा संदेश देऊ नका,’ असे न्यायालयाने म्हटले.‘काहीतरी घडले आहे, असे आम्हाला वाटते. जर हे प्रलंबित ठेवले तर सर्वत्र याची चर्चा होईल. आपल्याला राजकीय अधिकार आहेत, लोकशाही आहे, विचारांमध्ये फरक आहे. विचारधाराही भिन्न असू शकतात. परंतु, आपल्याला चांगले उदाहरण घालून द्यायचे आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. उदाहरणादाखल न्यायालयाने एका माजी मुख्यमंत्र्यांचा किस्सा सांगितला. एक ज्येष्ठ युनियन लिडर मंत्रालयावर मोर्चा घेऊन गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री स्वत: मंत्रालयाच्या इमारतीच्या खाली आले आणि युनियन लिडरला आपल्या दालनात नेले. ही राज्याची परंपरा आहे, असे न्यायालयाने म्हटले.ॲड. सतीश मानेशिंदे व ॲड. अनिकेत निकम यांनी राणे यांची बाजू न्यायालयात मांडली. ‘दोन्ही बाजूंनी शब्दांची देवाण-घेवाण झाली आहे. आम्हाला आशा आहे की, राज्य सरकारने अन्य एका प्रकरणात नोंदविण्यात आलेल्या चार गुन्ह्यांबाबत केले तेच याबाबातही करेल,’ असे मानेशिंदे यांनी म्हटले.राणे यांच्यावर कठोर कारवाई न करण्यासंदर्भात आपल्याकडे सूचना नाही, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने याबाबत महाअधिवक्त्यांनी विधान करावे, असे म्हटले. ‘आपल्या तरुणपिढीपुढे चांगले उदाहरण ठेवूया. एक एखाद्या विचारधारेचे पालन करतो, तर दुसरा अन्य विचारधारेचे पालन करतो, हे राजकारणात घडत असते. प्रत्येकाला स्वत:ची आवड-निवड आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली.

काय आहे प्रकरण?राणे यांनी रायगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याबाबत वक्तव्य केले. राज्यभरात राणे यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले. धुळे येथे राणेंवर सर्वांत आधी गुन्हा नोंदविण्यात आला. तो गुन्हा रद्द करण्यास राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

चांगली भावना निर्माण होण्याचा आशावाद- सुनावणीवेळी न्या. वराळे यांनी राणेंना महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेची आठवण करून दिली. - असाही एक काळ होता की, राजकारणातील दोन मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात निवडणूक - लढायचे, मात्र, त्यापैकी एक त्यांच्या मुलांना एकत्र शाळेत सोडायचे, ही आपली परंपरा आहे. - राज्यात चांगली भावना निर्माण होईल, अशी आशा करूया, असा आशावादही न्यायालयाने व्यक्त केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे High Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र