शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

‘त्या’ दोन मंदिरांच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेशबंदी

By admin | Published: April 03, 2016 3:50 AM

शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा मुद्दा चर्चेत असताना पुरोगामी पुणे जिल्ह्यातील कानिफनाथ गड आणि शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेश

- सुषमा नेहरकर, प्राची मानकर, राजु इनामदार . पुणे

शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा मुद्दा चर्चेत असताना पुरोगामी पुणे जिल्ह्यातील कानिफनाथ गड आणि शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेश नसल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. समानतेच्या कायद्याचे कसोशीने पालन केले जाईल, असे राज्य सरकार सांगत असले तरी, गाभाऱ्यात महिलांनी प्रवेश केल्यास ‘देवाचा कोप होईल, प्रेतांचे ढिग पडतील’ अशी भीती कानिफनाथ गडावर या प्रतिनिधींना घातली गेली.पुण्यापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर बोपदेव घाटाच्या पुढे गराडे गावात एका टेकडीवर हे कानिफनाथांचे मंदिर आहे. गाभाऱ्यापर्यंत आलेल्या दोन तरुणींना पाहून पुजाऱ्याने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. भाविकांसह अन्य पुजारी जमा झाले. आतापर्यंतच्या इतिहासात कानिफनाथाच्या गाभाऱ्यात महिलांनी प्रवेश केला नाही. त्यामुळे तुम्ही देखील असे पाप करू नका, याचे परिणाम खुप वाईट होतील... सर्व नवनाथांना स्त्रीया व्यर्ज आहेत. त्यामुळे तुमच्या पाया पडतो. तुम्ही बाहेर जा. न्यायालयाचा निर्णय आम्हाला माहित नाही.... तुम्ही धर्माशी खेळू नका...लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यास येथे प्रेतांचे ढिंग पडतील.. अशी टोकाची भाषा वापरत या तरुणींना बाहेर काढण्यात आले. टेकडीवर असलेले हे मंदिर जुने, नाथांची गढी असते तसे गडासारखेच आहे. तिथे कानिफनाथांच्या समाधीवर एक घुमटी आहे. साधारण दीड फूट गुणिले दोन फूट अशी जमिनीलगत असलेली खिडकी म्हणजे या घुमटीचे प्रवेशद्वार. त्यातून प्रथम डोके आत घालायचे व अंग तसेच जमीनीवर पसरून पुढेपुढे जायचे. त्याआधी शर्टपँट काढून तिथेच मिळत असलेली भगवी शाल पांघरायची व लुंगी घालायची. नंतरच प्रवेश करायचा. हे लुंगी व शालीचे फॅडही गेल्या काही वर्षातच सुरू झालेले आहे. दोन मुलींनी या घुमटीच्या चौथऱ्यावर प्रवेश केला, त्या खिडकीतून आत जाण्याचा आग्रह धरला, त्याला विश्वस्त मंडळाने स्पष्ट शब्दात नकार दिला. न्यायालयाचा निकाल नाथ पंथी मंदिरांना लागू नाही असेही त्यांनी परस्पर ठरवून टाकले. भाविकांनीही ‘कशाला काहीही करता, देवाचा कोप होईल, नाथ पंथाचे सगळेच कडक असते’ अशी समजूत काढण्यास सुरूवात केली. साप निघाल्याचा बनावया तरुणी केवळ गाभाऱ्याच्या दरवाजापर्यंत गेल्यावर देवाने लगेच दृष्टांत दाखवत मंदिर परिसरात साप निघाल्याचा बनाव येथील पुजाऱ्याने केला. अन्य उपस्थित भाविकांनाही हेच सांगण्यात आले. अशा प्रकारे लोकांच्या भावनांचे भांडवल करत पूर्वपार चालत आलेल्या रुढी घट्ट करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक होत असल्याचे दिसले.विश्वस्त मंडळ गोंधळलेलेकानिफनाथ देवस्थान विश्वस्त मंडळाचे कोणीही विश्वस्त त्यावेळी गडावर नव्हते. व्यवस्थापक संतोष गोफणे यांनी तिघाही विश्वस्तांशी दुरध्वनीवरून संपर्क करून दिला. तिघांपैकी एफक्त एकालाच न्यायालयाच्या निकालाची माहिती होती. पण त्यांच्यात महिलांना मंदिरात जाऊ देणार नाही ही एकवाक्यता होती.विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली फडतरे म्हणाले,‘‘ ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. न्यायालयाचा निकाल काय आहे ते माहिती नाही. शनी मंदिराचा विषय सध्या सुरू आहे, पण ते मंदिर वेगळे व हे वेगळे,नाथांना स्त्री वर्ज्य आहे. त्यामुळे आम्ही तिथे तुम्हाला जाऊ देणार नाही. ’’ न्यायालयाच्या निकालाची त्यांना माहिती दिल्यावर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा विषय ठेवू असे ते म्हणाले.सचिव जयंतराव फडतरे यांनी सुरूवातीला बोलताना देवाचा काही कोप झाला तर जबाबदारी आमची असेल असे लिहून द्या व मग जा असे सांगितले. तसे लिहून देण्याचे मान्य केल्यावर मात्र त्यांनी भुमिका बदलली. ते म्हणाले.‘‘धार्मिक भावनांना तुम्ही-आम्ही हात घालू नये. भाविकांच्या श्रद्धा आहेत आजच्या नाहीत, जुन्या आहेत. त्यामुळे महिलांना मंदिरात जाऊ देणार नाही.’’ सचिव दीपक फडतरे म्हणाले,‘‘ न्यायालयाचा निकाल माहिती आहे. मात्र तो त्या देवस्थानाविषयी आहे. आम्हाला तो लागू होणार नाही. इथे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्याला काही कारणे आहेत,त्याची माहिती न घेता महिलांच्या प्रवेशाचा आग्रह धरणे योग्य नाही.’’कानिफनाथांचे मुख्य ठाणे मढी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे आहे. तिथे मात्र महिलांना खुला प्रवेश आहे. या गडाचा कारभारही विश्वस्त मंडळामार्फत चालविला जातो. शिवशंकर राजळे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले.‘‘ देवाच्या दारात सगळेच सारखे! आमच्या मंदिरात महिलांना प्रवेश द्यायचा नाही, किंवा एखाद्या विशिष्ट जागेवर त्यांना जाऊ द्यायचे नाही असे काहीही नाही. पूर्वीपासूनच नाही. थेट समाधीजवळ गाभाऱ्यात जाऊन महिला दर्शन घेऊ शकतात. त्यांना कसलीही आडकाठी केली जात नाही.’’ओंकारेश्वर मंदिरातही तेचपुण्यातील प्रसिद्ध ओकांरेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश करुन अभिषेक करता येत नाही़ असा कोणी अभिषेक करण्याची इच्छा व्यक्त केली तरी त्यांना नकार दिला जातो, असेही दिसून आले. मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिरास ऐतिहासिक, तात्कालिन, वास्तूशास्त्रीय व धार्मिक परंपरांची पार्श्वभूमी लाभलेली आहे़ मात्र, येथेही गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही. एका तरुणीने मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मंदिराच्या मुख्य व्यवस्थापकांनी रूढीपरंपरेप्रमाणे महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊन अभिषेक करता येणार नाही,असे सांगितले. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले. आधी येथे स्मशान होते. १९७२ ला स्मशान हलवण्यात आले. हा स्मशानवासी शंकर असल्यामुळे महिलांना प्रवेश दिला जात नाही. मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊन अभिषेक करायचा असल्यास मंडई मध्ये रामेश्वरचे मंदिर आहे. तिथे जाऊन पुजा करा, असेही त्यांनी सांगितले. ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन आहे. नव्याने काही परंपरा बनवल्या गेल्या नाहीत. तेव्हापासून महिलांना येथे प्रवेश दिला जात नाही. पुरूषांना सोहळ नेसून गाभाऱ्यामध्ये अभिषेक करण्याची परवानगी का आहे याचे उत्तर माझ्याक़डे नाही. आत्तापर्यंत सर्व महिला पिंडींची पुजा करत आल्या आहेत. - ओंकारेश्वर मंदिराचे पुजारी