मुरबाड : तालुक्यातील नानकसवाडी (पवाळे) येथील सुमारे ८५ आदिवासींची गेल्या अनेक वर्षांपासून रेशनिंग कार्ड नसल्यामुळे उपासमार होत असलेल्या महिलांना न भेटता जिल्हाधिकारी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.बुधवार, ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी अश्विनी जोशी मुरबाडमधील शासकीय विश्रामगृहात तलाठ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी येणार असल्याची चाहूल आदिवासी बांधवांना लागली होती. त्यानुसार, त्यांनी सकाळपासून त्यांना आपल्या समस्यां सांगण्यासाठी भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला महत्त्वाची मीटिंग आहे. तुम्ही ठाण्याला या, असे सांगून त्या गेल्या. यानंतर, संतप्त आदिवासींच्या समस्या ऐकण्यासाठी तहसीलदार सर्जेराव मस्के -पाटील यांनी तत्काळ पवाळे व माल्हेड येथील रास्त भाव दुकानदाराला दप्तर घेऊन तहसील कार्यालयात बोलवून ज्या आदिवासींना कार्ड नाहीत, त्यांना प्राधान्य योजनेत समाविष्ट करण्याचे आश्वासन देऊन त्यांचे समाधान केले.
‘त्या’ आदिवासींना मिळणार रेशनकार्ड
By admin | Published: September 10, 2015 12:31 AM