शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

दणका म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:30 AM

सर्वोच्च न्यायालयाने आमच्याविरुद्ध कोणतेही ताशेरे ओढलेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आमच्या विभागाला दणका दिला, असे म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला महिला व बालकल्याण बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी हाणला आहे. ​​​​​​

मुंबई : राज्याच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पूरक पोषण आहाराच्या कंत्राटांबाबत राबवलेली प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, नियमानुसारच तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच होती. सर्वोच्च न्यायालयाने आमच्याविरुद्ध कोणतेही ताशेरे ओढलेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आमच्या विभागाला दणका दिला, असे म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला महिला व बालकल्याण बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी हाणला आहे.या प्रक्रियेची माहिती नसलेल्या व केवळ विरोधासाठी विरोध करण्यास आतुर असलेल्यांनी निराधार आरोप केले आहेत. मुळात मार्च २०१६ मध्ये आमच्या विभागाने पोषण आहार पुरवठ्याची निविदा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसारच काढली होती. तिच्या अटी व शर्ती वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील आणि अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या असलेल्या समितीने निश्चित केल्या होत्या. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची मान्यता घेऊनच या निविदा प्रकाशित करण्यात आल्या. नागपूर उच्च न्यायालय, औरंगाबाद उच्च न्यायालयाने या अटी व शर्ती वैध ठरविल्या होत्या. दोन्ही खंडपीठाच्या निकालांमध्ये अधिक स्पष्टता यावी म्हणून महिला व बालविकास विभागाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने १९ एप्रिल २०१७ मध्ये आदेश दिले की मार्च २०१६ च्या निविदेच्या अटी व शर्तीनुसार निवड झालेल्या महिला संस्था बचत गटांना तात्पुरत्या स्वरूपात पुरवठा आदेश देण्यात यावे तसेच ज्या जुन्या महिला बचत गटांचे व संस्थांची तीन वर्षांची मुदत संपलेली आहे, त्यांचे काम तत्काळ रद्द करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे त्यानुसार मुदत संपलेल्यांची कामे रद्द करण्यात आली आणि २०१६ च्या निवेदनानुसार निवड झालेल्या १८ महिला बचत गटांना प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पुरवठा आदेश देण्यात आले. नंतरच्या काळात केंद्र सरकारने पूरक आहाराबाबत नवीन मार्गदर्शक सूचनांचे शपथपत्र ६ आॅगस्ट २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. त्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करूनच ८ मार्च २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि पुरक पोषण आहाराची प्रक्रिया या मार्गदर्शक तत्वानुसार राबवण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र शासनाच्या कार्यपद्धतीवर कोणतेही ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले नाहीत. हा निर्णय सर्व राज्यांसाठी लागू होणार आहे, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय