पुणे : बनावट नाव सांगून दादर रेल्वे स्टेशन व इतर चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडविणार असल्याचा फोन करणाऱ्याला पुणे रेल्वे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले.सागर राजेंद्र नाकती असे त्याचे नाव आहे. ‘राजू शुक्ला’ अशी स्वत:ची ओळख देत, त्यानेपुणे पोलीस नियंत्रण कक्षालाफोन केला आणि आपण चारबॉम्ब बनविले असून, त्याद्वारे दादर रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे त्याने सांगितले. फोनच्या आधारे रेल्वेचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तपास करून सागर याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्यास अटक
By admin | Published: January 25, 2016 2:49 AM