शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मलिकांपेक्षाही भयंकर गुन्हे असलेले तुमच्यासोबत बसलेत; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 11:27 AM

देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

मुंबई - तुमच्या सभागृहात आणि संसदेत असे लोक तुम्ही पक्षात घेतलेत ज्यांच्यावर नवाब मलिकांपेक्षा भयंकर गुन्ह्यांची नोंद आहे. आर्थिक फसवणूक ही एकप्रकारे आर्थिक दहशतवाद आहे.हे पंतप्रधान नेहमी सांगतात.आमच्या पक्षाचे खासदार, राष्ट्रवादीचे खासदार तुम्ही सोबत घेतले त्यांच्यावर आरोप आहेत. तुम्हाला त्यांच्यापासून काही त्रास नाही.प्रफुल पटेल जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. जेव्हा ते केंद्रात मंत्री होते तेव्हा भाजपानेच आरोप केले होते अशी आठवण करत संजय राऊतांनीभाजपावर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, पटेल यांचे दाऊद आणि इक्बाल मिर्ची यांच्यासोबत आर्थिक व्यवहार आहेत असं म्हटलं होते. आज प्रफुल पटेल कोणासोबत आहेत? नवाब मलिकांना तुम्ही टार्गेट करताय मग प्रफुल पटेल चालतात? तुम्ही कायद्याची, नैतिकतेची भाषा करता, देशभक्तीबाबत बोलता मग देशभक्तीची व्याख्या नवाब मलिकांना वेगळी आणि प्रफुल पटेल यांना वेगळी आहे का? भावना गवळी, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक यांच्यासाठी वेगळी आहे का?असा सवाल संजय राऊतांनी भाजपावर ढोंगीपणाचा आरोप केला आहे. 

भाजपाच्या नैतिकतेचे ऑडिट व्हायला हवं

नाशिकमध्ये ड्रग्स रॅकेट समोर आले, पुण्यातून ललित पाटीलला पळवलं या प्रकरणात २ मंत्री सहभागी आहेत. तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली? सरकारच्या मदतीशिवाय ससून रुग्णालयात ९ महिने एक कैदी राहतो आणि तिथून पळून जातो. मंत्र्यांनी मदत केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. तुम्ही काय केले. भाजपाला नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. यांच्या सरकारमधील बहुतांश मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. नैतिकतेचे फुगे फुगवता पण ही नैतिकता औषधलाही शिल्लक आहे का? भाजपाच्या नैतिकतेचे ऑडिट व्हायला हवं असा चिमटा संजय राऊतांनी काढला. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली. दोघांचे दाऊदशी संबंध दाखवले आहेत. दोघांनी दाऊदच्या हस्तकांसोबत व्यवहार केले आहेत. मग प्रफुल पटेल हे पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.पण नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं फडणवीस म्हणतात.बेईमान, गद्दार लोकांनी ईडीला घाबरून पलायन केले कारण तुमच्यावर गंभीर आरोप आहेत. ईडीने अटक करायचे वॉरंट काढलेत ते नवाब मलिकांवर टीका करतायेत असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदे गटालाही लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाnawab malikनवाब मलिकPraful Patelप्रफुल्ल पटेल