शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मालवाहतूकदारांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:48 AM

उद्योगधंद्यांना ब्रेक; जीवनाश्यक वस्तुंची आवक मंदावली

मुंबई : माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनामुळे राज्यातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प होऊन उद्योगधंदे थंडावले आहेत. अकोला, भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर १२ हजार टन खतांचा साठा पडून राहिला आहे. त्यामुळे शेतीवर देखील प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. भुसार, भाजीपालासह जीवनावश्यक वस्तूंची आवक बाजारात मंदावली आहे. संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कच्च्या मालाच्या अभावामुळे तसेच तयार माल पडून राहिल्याने औद्योगिक वसाहतीमधील काम मंदावले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून दररोज किमान ६०० ट्रक साखर देशभरात निर्यात केली जाते; ती ठप्प होऊन २०० कोटींची उलाढाल थांबली आहे. भाजीपाला, कांदा-बटाटे, गॅस सिलिंडर, धान्य, पेट्रोल, डिझेल यांवर विपरीत परिणाम झाला आहे.मराठवाड्यातील उद्योगाला १२५ कोटींचा फटका बसला आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून दररोज २ हजार ट्रकमधून जवळपास ३२ हजार टन कच्चामाल दाखल होत असतो. संपामुळे जवळपास १ लाख ९२ हजार टन माल दाखल झालेला नाही. त्यामुळे २४ तास चालणारी यंत्रांना ब्रेक लागला असून उत्पादन १५ टक्क्यांनी घटले आहे.१२ हजार टन खतांचा साठा पडूनमहाराष्ट्राच्या इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचा१२ हजार टन खतांचा साठा जळगाव, भुसावळ आणि अकोला रेल्वे स्थानकावर पडून आहे. या साठ्याची उचल कशी करावी, हा पेच आता प्रशासन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. पावसाचे दिवस आहेत. अकोला रेल्वे स्थानकावरील गोडावूनमध्ये जागा नाही. रेल्वे स्थानकावर उतरलेले रासायनिक खत हलविण्याची दुसरी यंत्रणा नाही. निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मालवाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाºयांना खत वाहतूक करण्याची विनंती केली. परंतु त्यांनी नकार दिला आहे.

टॅग्स :Strikeसंपvegetableभाज्याMilk Supplyदूध पुरवठा