विवेक भुसे
पुणे : सायबर गुन्ह्यांबाबतच्या तक्रारीत तिपटीने वाढ होत असताना राज्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मात्र त्या मानाने कमी आहे. गेल्या ५ महिन्यात १ हजार ५१८ गुन्हे दाखल झाले असून केवळ ८८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर गुन्हे करणाºया टोळ्या या प्रामुख्याने परराज्यातील असल्याने लॉकडाऊनच्या काळात प्रवासावरील बंधनांमुळे हा तपास जवळपास थंडावला आहे़.
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये काही हजारांपर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल आहेत. मात्र, या सर्व तक्रारींचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक तेवढे बळ उपलब्ध नाही़ दुसरीकडे यातील सायबर चोरटे हे प्रामुख्याने नोएडा, दिल्ली, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान या राज्यातील असल्याने तेथे जाऊन त्यांच्या शोध घेऊन आरोपींना पकडणे हे अतिशय अवघड काम झाले आहे.
राज्यात सायबर गुन्हेगारीमध्ये डेबिड कार्ड, क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक विचारुन फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. याशिवाय फसवणुकीचे वेगवेगळे फंडे वापरुन सायबर चोरटे नागरिकांना आॅनलाइन लुबाडताना दिसत आहेत.
गेल्या वर्षी २०१९ मध्ये राज्यात ४ हजार ६२२ सायबर गुन्हे दाखल झाले होते़ तर, २०१८ मध्ये ३ हजार ५११ गुन्हे दाखल झाले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यात सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक केलेल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्याचा प्राथमिक तपास केल्यानंतर या तक्रारीवरुन गुन्हे दाखल केले जातात. कोरोनामुळे पोलिसांकडून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या ५ महिन्यात राज्यात १ हजार ५१८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक गुन्हे हे जानेवारीमध्ये ४२० दाखल झाले होते. त्यापैकी ३५ गुन्हे उघड होऊन ४७ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे.
लॉकडाऊनमुळे पोलीस परराज्यात जाऊन तपास करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपीचे ठिकाण निष्पन्न झाले असले तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांना अटक करणे पोलिसांना शक्य झालेले नाही. त्याचा प्ररिणाम गुन्हे उघडकीस येण्यावर झाला आहे.
़़़़़़़़़़
आॅनलाइन फसवणूक:
आॅनलाइन फसवणुकीत प्रामुख्याने डेबिड /क्रेडिक कार्ड क्लोनिंग, आॅनलाइन खरेदी करुन फसवणूक, ओटीपी शेअर करायला लावून फसवणुक करणे, हनीट्रॅप, सोशल मीडियावर बदनामी, वाहन खरेदीत फसवणूक, फेसबूक हॅकिंग, जॉब फ्रॉड, गिफ्ट फ्रॉड अशा प्रकारे गुन्ह्यांचे स्वरूप आहे.
़़़़़़़़
राज्यातील जानेवारी ते मे २०२० पर्यंतचे सायबर गुन्हे
प्रकार गुन्हे उघड अटक आरोपी
क्रेडिट कार्ड १०४ ३ ९
डेबिड कार्ड/एटीएम १५७ ६ १५
आॅनलाइन बँकिंग फ्रार्ड ३३२ १५ १२
ओटीपी शेअर। १५० ४ ०
इतर २४२ २० २३
अन्य फसवणूक ५३३ ४० ३७
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
एकूण १५१८। ८८ ९६
़़़़़़़़़़़़़़़़़
गुन्ह्यांचे प्रमाण
महिना दाखल उघड आरोपी अटक
जानेवारी ४२० ३५ ४७ -
फेब्रुवारी ४०८ २५ २३ -
मार्च ३२३ १३ १० -
एप्रिल १४५ ६ १० -
मे १९२ ९ ६ -