शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

धुळगावमध्ये गॅस्ट्रोचे शंभरावर रुग्ण

By admin | Published: January 07, 2015 10:00 PM

दूषित पाण्याचा फटका : ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा

सोनी : धुळगाव (ता. तासगाव) येथे गॅस्ट्रोसदृश तापाची लागण झाली असून, सुमारे शंभरावर रुग्ण या साथीने आजारी आहेत. गावामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केल्याने लोक आजारी पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.धुळगाव येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी चार दिवसांपासून आलेले नाही. त्यामुळे गावातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने गावच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी गेल्या दोन दिवसांपासून नळांना सोडले. विहिरीच्या पाण्याचा उपसा नसल्याने ते दूषित झाले असून, ते पिल्यामुळे नागरिकांना जुलाब, उलटी व तापाचा त्रास जाणवू लागला असून, गावातील ७० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयातही रुग्णांची गर्दी झाली आहे. ग्रामपंचायतीने पाणी सोडण्यापूर्वी काळजी घेतली नाही. त्यातच गावात नळासाठी खोल खड्डे खणले आहेत. त्यामध्ये गटारीचे पाणी जाऊन हा त्रास वाढल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर डुबल म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पिण्याचे पाणी गावात सोडताना योग्य ती काळजी घेतली नसल्यामुळे ही साथ पसरली आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासास ग्रामपंचायत जबाबदार आहे. धुळगाव येथे गॅस्ट्रोची साथ आहे, हे समजताच तासगाव पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या योजना शिंदे यांनी भेट देऊन रुग्णांची चौकशी केली व वैद्यकीय पथकांना योग्य दक्षता घेण्याची सूचना केली. (वार्ताहर)पाण्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीविहिरीच्या पाण्यामध्ये अळ्या आढळून आल्या असून, पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. असे पाणी पिल्याने ग्रामस्थांना त्रास जाणवू लागला आहे. रुग्णांमध्ये वृद्धांचा व लहान मुलांचा समावेश अधिक प्रमाणात आहे. गावात अनेक कुटुंबांतील सर्वच सदस्य आजारी पडल्याने बाहेरगावचे त्यांचे नातेवाईक येऊन त्यांची काळजी घेऊ लागले आहेत.