शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ठाणेकरांचे हात हजारो, दुबळी...

By admin | Published: June 05, 2017 3:18 AM

ग.दि. माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय शेअर फाउंडेशनच्या ‘शेअर स्ट्रीट’ या उपक्रमातून ठाणेकरांना आला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘पोटापुरता पैसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ या ग.दि. माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय शेअर फाउंडेशनच्या ‘शेअर स्ट्रीट’ या उपक्रमातून ठाणेकरांना आला. गरजूंना देण्यासाठी अक्षरश: शेकडो हात पुढे आले... मात्र, ते घेणाऱ्यांची संख्या अपुरी पडल्याने दानशूर ठाणेकरांकडून जमा झालेली ट्रकभर भांडी आणि कपडे पुन्हा आपल्या गोदामात ठेवण्याची वेळ आयोजकांवर आली.ठाणेकरांनी दिलेल्या या भरघोस प्रतिसादामुळे १५ दिवसांनी वागळे इस्टेट येथील इंदिरानगर, कळव्याच्या आतकोनेश्वरनगर, फुलेनगरसारख्या ठिकाणी हा उपक्रम पुन्हा राबवणार असल्याचे शेअर फाउंडेशनच्या निशीता अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि विलास साठे यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी आवाहन केल्याप्रमाणे ठामपा मुख्यालयासमोरील कचराळी तलावासमोर रविवारी एका विशेष ‘शेअर स्ट्रीट’चे आयोजन केले होते. सकाळी ७ ते ११.३० दरम्यान हा मोफत देवाणघेवाणीचा अभिनव उपक्रम पार पडला. या ठिकाणी १२ स्टॉल लावले होते. संपूर्ण ठाणे शहरातून आलेल्या साधारण ९० ते १०० रहिवाशांनी या ठिकाणी जुने परंतु चांगले कपडे, खेळणी आणि भांडी जमा केली. ती घेण्यासाठी सिद्धेश्वर तलाव परिसरासह आजूबाजूच्या गरजूंनी येथे गर्दी केली. साधारण २५० ते ३०० रहिवाशांनी कुपन घेऊन रीतसर आपल्याला हव्या त्या वस्तू येथून घेतल्या. फाउंडेशनकडे यापूर्वी अर्धा ट्रक असे सामान नागरिकांनी जमा केले होते. रविवारी यात भर पडून ते दोन ट्रक भरतील, इतके जमा झाले. जितके सामान जमा झाले, त्या तुलनेत घेणाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने उरलेल्या सामानासह आयोजक स्वयंसेवकांना आवराआवर करावी लागली. ठाण्याचे आ. संजय केळकर यांच्यासह शेअर फाउंडेशनच्या शिवानी वर्मा, आचल सदारंगानी, यज्ञेश गोडसर, सयाना पवित्रण, राहुल श्रीवास्तव आणि पूजा जैन आदी २५ स्वयंसेवकांनी ठामपाच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी केला. यातून साधारण चार बॉक्स भांडी, कपडे आणि इतरही सामान जमा झाले असून ते गरजूंना देण्यासाठी पुन्हा शेअर स्ट्रीटचे आयोजन करणार असल्याचे विलास साठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आपल्या वस्तूंचा योग्य प्रकारे विनियोग होत असल्याचे पाहून देणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विनामूल्य गरजेच्या वस्तू मिळाल्याने घेणाऱ्यांनीही कृतज्ञता व्यक्त केली.