ऑनलाइन लोकमत
मिर्जापूर, दि. 12 - देशात 500, 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर नोटा जाळण्याच्या, कच-यामध्ये फेकण्याच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर नोटा आढळल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.
शुक्रवारी गंगा नदीच्या पात्रातही लाखो रुपयांच्या नोटा आढळून आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील गंगा नदीच्या पात्रात फाटलेल्या 1000 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या.
स्थानिकांच्या ही बाब निर्दशनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांनी दिली.
आणखी बातम्या
(गंगेत चार आणेही न टाकणारे आता हजारो टाकतायंत - नरेंद्र मोदी)
(सोन्याचा भाव उतरला, 34 हजारांवरुन 30 हजार रुपये)
(धक्कादायक ! सुट्टे पैसे नसल्यामुळे नवजात मुलाचा मृत्यू)
गोणी भरुन नोटा जाळल्या
या घटनेपूर्वी, उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये 500, 1000 रुपयांच्या नोटा जाळण्यात आल्याची घटना समोर आली होती. एका कंपनीतील कर्मचा-यांनी गोणी भरुन नोटा आणून त्या जाळल्याची माहिती समोर आली. पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार, या नोटा पहिल्यांदा फाडण्यात आल्या, त्यानंतर त्या नष्ट करण्यासाठी गोणीला आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे.
कारमध्ये सापडले 4 कोटी रुपये
बुलडाण्यातील खामगाव येथील मलकापूर येथे लोहा व्यावसायिक शब्बीर हुसैनला 4 कोटी रुपयांसहीत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील तीन बँगांमध्ये 1000 हजारांच्या नोटा सापडल्या आहेत. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील अंतुर्ली फाटाजवळ वाहन तपासणीदरम्यान मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे.